रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल किंवा देशभरामध्ये नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत हेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. – सार्वजनिक बांधकाम मंत्री, रवींद्र चव्हाण….

Spread the love

रत्नागिरी/ प्रतिनिधी- आज रत्नागिरी भाजप च्या बूथ च्या पदाधिकाऱ्याचा मेळावा स्वा. सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी पत्रकारा शी बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे उपस्थित होते.यावेळी बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीमध्ये बुथ रचना मजबूत करण्यासाठी बुथ वॉरियर च्या मार्गदर्शन करण्यासाठी सदरचा मेळावा घेण्यात आला होता.

मोदीजींच्या 400 पार चा नारा घराघरापर्यंत पोचवण्याचे काम करायचे आहे…

महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला आपण सर्वांनी पूर्ण ताकतीने आणि पूर्ण बहुमताने निवडून आणण्याचे सर्वांनी क्षमतेने काम करायचे असून 370 पेक्षा जास्त उमेदवार वाढवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं सांगितलं पाहिजे.विरोधक आज लोकांना भावनिक आवाहन करतात त्यावेळी त्यांना गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी जे काम केले ते पटवून सांगण्याचे काम केले पाहिजे.

सर्व नेते मंडळी करत असतात आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचंड ही मेहनत करावी लागणार आहे.कार्यकर्त्यांची एकजूट करावी लागते.त्यांच्यामध्ये कुठेही संभ्रम होऊ नये या मानसिकतेमध्ये त्यांना सर्वांना एकत्र ठेवून हे काम संघटना म्हणून आम्ही सर्वजण करत असतो.

आज जिल्हाध्यक्ष दोन्ही रत्नागिरीचे दक्षिण आणि उत्तर दोन्ही जिल्हाध्यक्षांनी इथले असणाऱ्यातीन या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये असणाऱ्या तिन्ही या विधानसभेचे मतदान संघ आहेत त्या मतदारसंघांमध्ये प्रत्येक बूथवरच्या बूथ वॉरियरला प्रत्येकाला आज इथे निमंत्रित केलं होतं.आणि त्यांना सर्वांना ही दिशा दिली पाहिजे एनडीएचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत मतदानात जिंकला पाहिजे ती दिशा देण्याचं काम आज आम्ही केलं असल्याचे ही चव्हाण यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्हावासीयांचा निर्धार, पुन्हा एकदा मोदी सरकार…

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला देशात ४००+ हा आकडा गाठायचा आहे, तर महाराष्ट्रात महायुतीसाठी ४५+ हे ध्येय आपण समोर ठेवले आहे. यासाठी प्रत्येक मतदार आणि प्रत्येक मतदारसंघ महत्त्वाचा आहे. त्यामुळे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात जाऊन मोदीजींनी गेल्या १० वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडणं गरजेचं आहे. यासाठी रत्नागिरीतील भाजपा कार्यकर्त्यांसोबत रवींद्र चव्हाण यांनी संवाद साधला.

रत्नागिरी, चिपळूण-संगमेश्वर व राजापूर-लांजा-साखरपा या तीन विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या विधानसभा वॉरिअर्स, शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुख यांची बैठक आज रत्नागिरी येथील स्वा.वि.दा.सावरकर नाट्यगृह येथे पार पडली. या बैठकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या तयारीच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

मोदींचे विकसित भारत संकल्प पूर्ण करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार विजयी करा….

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात एनडीएच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करा तसेच सर्वांनी एकत्र येऊन निवडणुकीचे काम करा असे आवाहनही यावेळी केले.या बैठकीप्रसंगी आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे अतुल काळसेकर, रत्नागिरी दक्षिण भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सांवत, केदार साठे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्हावासीयांचा निर्धार, पुन्हा एकदा मोदी सरकार- आमदार नितेश राणे.

आज रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात संपन्न झालेल्या ४६ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील बूथ कार्यकर्ता व सुपर वॉरियर्स संमेलनात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला देशात ४००+ हा आकडा गाठायचा आहे, तर महाराष्ट्रात महायुतीसाठी ४५+ हे ध्येय आपण समोर ठेवले आहे. यासाठी प्रत्येक मतदार आणि प्रत्येक मतदारसंघ महत्त्वाचा आहे. त्यामुळे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात जाऊन मोदीजींनी गेल्या १० वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडणं गरजेचं आहे. यासाठी रत्नागिरी, चिपळूण-संगमेश्वर व राजापूर-लांजा-साखरपा या तीन विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या विधानसभा वॉरिअर्स, शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुख यांची बैठक आज रत्नागिरी येथील स्वा.वि.दा.सावरकर नाट्यगृह येथे पार पडली. या बैठकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या तयारीच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.


रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात एनडीएच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी यावेळी कमळ चिन्हाचा खासदार निवडून द्यायचा आहे – मा. आमदार बाळ माने …

भाजपा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा अंतर्गत रत्नागिरी येथे आयोजित बूथ कार्यकर्ता आणि सुपर वॉरियर्स संमेलनला बाळू माने यांनी संबोधन करताना म्हटले की,संबोधित देशामध्ये मा. नरेंद्र मोदी जी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी पुढच्या ३५ दिवसांचा जो कार्यक्रम ठरवला आहे त्याची अंबलबजावणी सर्वांनी कटोकरपणे करणे गरजेचे असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात भारत स्वप्न साकार करण्यासाठी यावेळी मात्र कमळ चिन्ह असणारा खासदारच निवडून द्यायचा असल्याचे आवाहन केले. भूत वरील प्रत्येक कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पुढच्या 35 दिवसात करायचे आहे. विरोधकांची खोटी आश्वासने व वक्तव्य दिशाभूल करणारी आहेत ते लोकांना पटवून सांगण्याची आज गरज आहे असे यावेळी आवर्जून सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page