नारायण राणेंची पत्रकार परिषद! रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा लढवण्याचे दिले संकेत; उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका…

Spread the love

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात गेले नाहीत पण दिल्लीला जातात. खासदार 5 आणि 16 आमदार असणाऱ्या व्यक्तीने पंतप्रधानांवर बोलावं अशी यांची योग्यता आहे का? (Uddhav Thackeray ) असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मंगळवार (दि. 2 एप्रिल) रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. दरम्यान, राणे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

नवी दिल्ली : Narayan Rane Press Conference : भाजपा नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. इंडिया आघाडीच्या दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या सभेवरून राणे यांनी ठाकरेंवर घणाघात केलाय. कोणत्याच ठाकरेंचं वाईट करणार नाही असा शब्द बाळासाहेबांना दिलाय, म्हणून शांत बसलोय, अशी धमकीवजा टीका राणे यांनी केली आहे. आपल्यावरील टीकेला उत्तर देण्यासाठी आणि टीकाकारांची वैयक्तिक औकात किती आहे हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहे असंही राणे यावेळी म्हणाले. तसंच, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फक्त दोन दिवस मंत्रालयात गेले. पण, आता दिल्लीत जात आहेत. आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहत आहेत असा टोलाही राणे यांनी लगावला आहे. ( Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार (Ratnagiri Sindhudurg)संघात पक्षाने निवडणूक लढवण्यास सांगितलं तर लढवायला मी तयार आहे असं म्हणत राणे यांनी लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत.

आमचा पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष…

आमचे 303 खासदार आहेत. यांचे किती तर 5 खासदार आहेत. आमच्या तुलनेत चटणी पण नाही अशी बोचरी टीका राणेंनी केली. येणाऱ्या निवडणुकीत फक्त पाच आमदार राहतील. अशा लोकांनी रामलीला मैदानात जाऊन बोलणं किती योग्य आहे. त्यांची राजकीय उंची काय? असं म्हणत पंतप्रधानांवर बोलण्याची त्यांची राजकीय आणि बौद्धिक उंची नाही. केवळ मुख्यमंत्री झाले म्हणून बोलणार का? अशी घणाघाती टीकाही नारायण राणे यांनी केली आहे. मोदींवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. मोदींचा पक्ष तडीपार करा म्हणतात, आमची केंद्रात अन् राज्यात सत्ता आहे. तडीपार करायचं असेल तर आम्ही कुणाला करू? असं म्हणत कोरोनामध्ये औषधांचे पैसे खाणाऱ्यांना आम्ही तडीपार करु, असंही राणे म्हणाले आहेत.

कोरोना काळातही सामनाला नफा….

उद्धव ठाकरे स्वत:ला काय समजतात माहिती नाही? बहुतेक त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. पंतप्रधानांवर बोलण्याइतकी यांची योग्यता आहे का? यांची गुणवत्ता नाही. तरी हे तडीपारची भाषा करतात. जगामध्ये सर्वात मोठा पक्ष आमचा आहे, असं राणे म्हणाले. शिवसेनेत मी चाळीस वर्ष होतो. आम्ही कधीही मातोश्रीवर रिकाम्या हाताने गेलो नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा काय व्यवसाय आहे. सामना वृत्तपत्र चालवतात. कोरोना काळातही सामनाला नफा कसा झाला? असा सवाल नारायण राणे यांनी यावेळी केला आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ भाजपचा -केंद्रीय मंत्री नारायण राणे

अखेर परदा पडला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा खूप दिवस चर्चेत असलेला विषय मिटला. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ हा भाजपला गेला . रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ भाजपचाच असल्याचे व आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केल्यावर या विषयावर पडदा पडला . रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदार संघ भाजपकडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत नारायण राणे यांनी अजून एक स्पष्ट केले आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाबाबत कोणीही लुडबुड करू नये असा इशारा वजा दम दिलाने एकच खळबळ उडाली आहे.

येणारे दोन दिवसांमध्ये कमळ चिन्हावरचा उमेदवार जाहीर होईल- नारायण राणे

दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत अनेक दिवस खूप चर्चा होत होती. हा मतदार संघ शिंदे शिवसेनेचा असल्याचा दावा शिंदे शिवसेनेने केला होता. त्यासाठी किरण सामंत हे शिंदे शिवसेनेकडून उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. असा दावाही करण्यात आला होता. तर भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी मिळेल असे सांगण्यात आले होते.परंतु त्यानंतर शिवसेना म्हणजेच शिंदे शिवसेनेने रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघावर आपला दावा दाखल केला होता..

पण भाजपाने आपले एका बाजूने आपले विविध कार्यक्रम या मतदारसंघात राबवत होते.दरम्याच आज मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट सांगितले की रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदार संघ भाजपचा असून तो भाजपचाच आहे. त्यामुळे इतर विषयांवर चर्चा थांबली असून आता कमळ या निशाणीवर उमेदवार निवडून येणार आहे. येणारे दोन दिवसांमध्ये कमळ चिन्हावरचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जाहीर होईल असे स्पष्ट नारायण राणे यांनी दिली आहे. कार्यकर्ते व राजकीय विश्लेषक यांच्या मते नारायण राणे यांच्यासाठी सदर मतदारसंघ सुटल्याचे स्पष्ट झाल्याचे दिसत आहे..

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page