
नवी मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर अद्वितीय गृहनिर्माण योजना , सिडको महामंडळाची आजवरची सर्वात मोठी गृहनिर्माण योजना ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ ही योजना, नवी मुंबईत सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. १२ सप्टेंबर २०२४ रोजी दसऱ्यापासून सुरू झालेली एकूण ६७,००० घरांच्या या योजनेच्या पहिल्या टप्प्यांतील २६,००० घरांची ऑनलईन नोंदणी येत्या ११ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात नवी मुंबईच्या प्रमुख ७ नोड्समधील रेल्वे, बस आणि मेट्रो स्थानकांसारख्या मोक्याच्या ठिकाणावर साकारत असलेली ही महागृहनिर्माण योजना अतिशय किफायतीशीर किमतीत घरे उपलब्ध करून देते. या अपूर्व योजनेविषयी माहिती जाणून घ्या.
11 डिसेंबर पर्यंत असलेली ही मुदत कदाचित वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. महाराष्ट्रातील व कोकणातील ग्रामीण भागातील जनतेला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने पनवेल नवी मुंबई या सगळ्या परिसरात घर खरेदीचा विचार करत असाल तर सिडकोच्या या ऑफर मधील लॉटरी योजनेचा समाजातील विविध घटकांसाठी उपयोग होऊ शकतो.
“ऑनलाइन नोंदणी” प्रक्रियेसाठी सिडकोने https://cidcohomes.com हा विशेष पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलवर इच्छुक खरेदीदारांसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सहज व सुलभ करण्यासाठी आवश्यक ती सर्व साधने आणि माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. अर्जदाराने एकदा नोंदणी केल्यावर, ती केवळ पहिल्या टप्प्यांतील २६००० घरांसाठीच नव्हे, तर ६७००० घरांची ही संपूर्ण योजना पूर्ण होईपर्यंत ग्राह्य असणार आहे.
दोन प्रमुख आर्थिक गट-
ही योजना मुख्यतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांना प्रामुख्याने लाभ देणारी आहे. या योजनेत EWS प्रवर्गातील अर्जदारांना प्रधानमंत्री आवास योजने (PMAY) अंतर्गत रु. २.५ लाखांचे अनुदान मिळू शकते. या योजनेतील घरे ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (TOD) या संकल्पनेवर आधारित आहेत. हे गृहनिर्माण प्रकल्प रेल्वे, मेट्रो आणि बस स्थानकांच्या जवळच्या खारघर, वाशी, बामणडोंगरी, तळोजा, मानसरोवर, कळंबोली आणि पनवेल आशा सात प्रमुख नोड्समध्ये उभारलेले आहेत.
डिजिटल सोडत अर्जदारांसाठी उचललेले सकारात्मक नवे पाऊल-
डिजिटल सोडत प्रक्रिया हे अर्जदारांच्या सुलभतेसाठी सिडकोने उचलेले सकारात्मक नवे पाऊल आहे. नोंदणीची पारंपरीक मानवीय (Manual) पद्धती या सोडतीच्या अर्ज व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी राबलेली नाही. कारण या महासोडतीचे व्यापक स्वरूप पाहता, वेगवान अंमलबजावणी शक्य व्हावी, त्याचप्रमाणे, आजवर आलेल्या मानवीय पद्धती अनुभवांतूनच अर्जदारांच्या सुविधेकरिता सिडकोने ‘ऑनलाइन नोंदणीची’ पद्धत सादर केली आहे.
१५ पसंतीची निवड प्रणाली-
ऑनलाइन नोंदणीनंतर, अर्जदारांना तीन वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये एकूण १५ पसंती निवडण्यास सांगितले जाते, प्रत्येक फेरीत अर्जदार ५ पर्याय निवडू शकतात. पहिल्या फेरीत घर न मिळाल्यास, अर्ज आपोआप पुढील फेऱ्यांमध्ये समाविष्ट केला जातो, ज्यामुळे पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता उरत नाही. अर्जदारांची घरखरेदीसाठी करावी लागणारी पारंपरीक पद्धतीची दगदग कमी करून घर खरेदीची आनंद मिळवून देते.
. https://cidcohomes.com या बुकींग पोर्टवरील पसंत निवडीच्या पर्यायांवर क्लिक केल्यावर तुम्हाला पसंत निवडीच्या
३ फेऱ्यांच्या विंडो दिसतील. त्यातील प्रत्येक विंडोत पाच पसंती तुम्हाला निवडता येतील.
2. या पहिल्या टप्प्यातील विंडोमध्ये पाच पसंती निवडतांना, तुम्हाला एक एक करून पाच वेळा प्रकल्पस्थळ, टॉवर
क्रमांक व मजला क्रमांक निवडता येईल.-
3. अर्जदारांना एकाच वेळी तिन्ही फेऱ्यांतील १५ पसंती निवडाव्या लागतील.
4. सोडतीच्या जाहीर पहिल्या तारखेला अर्जदाराला त्याच्या पहिल्या फेरीतील पाच पसंतीतून घर दिले जाईल.
5. ज्या अर्जदाराला पहिल्याच फेरीत घर मिळाले, त्याला याबाबत विविध संवादमाध्यमांद्वारे कळवले जाईल. घर मिळालेल्या अर्जदाराला सोडतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांतून वगळले जाईल.
6. ज्या अर्जदारांना या सोडतीत घर मिळाले नाही, त्यांनाही विविध संवादमाध्यमांद्वारे याबाबत कळवले जाईल त्यांना सोडतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांत त्यांना घरासाठी प्रतिक्षा करावी लागेल.
बांधकाम गुणवत्ताः टिकाऊपणा आणि उत्कृष्टतेची हमी-
या योजनेतील घरांचे जागतीक दर्जाचे आराखडे व बांधकाम या क्षेत्रातील आजच्या अग्रगण्य तज्ज्ञांनी केले आहेत. सिडकोने अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे, बांधकाम वेळेत बचत होते तसेच प्रत्येक संरचनेत उच्च्च पातळीची अचूकता आणि निर्मिती सातत्य राखले जाते. पर्यावरणपूरक बांधकाम, भूकंपरोधक प्रणालीचा वापर तसेच, हरीतक्षेत्रे, सांडपाण्याची प्रभावी व्यवस्था, मलजल प्रक्रिया संयंत्रे, तर काही प्रकल्पांमध्ये असणारी बहुमजली पार्किंग सुविधा तसेच या प्रकल्पातील अंतर्गत वा जवळची खरेदी क्षेत्रे, दुकाने यांसारख्या अतिरिक्त सुविधा रहिवाशांची जीवनशैली अधिक आनंददायी बनवतील.
नोंदणी व पडताळणी महत्त्वाची का आहे?..
अपात्र अर्जदार किंवा फसव्या खरेदीदारांना घरांचे वाटप होणार यावर सुरुवातीपासूनच सिडकोचा कटाक्ष राहिला आहे. त्यासाठी कागदपत्रांच्या बाबतीत अतिशय दक्षता व काटेकोरपणा पाळण्यात येतो. ऑनलाइन नोंदणीसाठी दस्तऐवजांची पूर्तता, बारकोड, नोटराइज्ड आणि स्कॅन केलेली कागदपत्रे आपले स्वप्नातील घर पारदर्शक पद्धतीने साकारण्यासाठी आवश्यक आहेत.
आवश्यक कागदपत्रे
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)-
१. अधिवास प्रमाणपत्र- बारकोड अनिवार्य (माजी सैनिकांना सूट)
२. उत्पन्नाचा पुरावा
३. आधार कार्ड / पॅन कार्ड
४. प्रधानमंत्री आवास योजना प्रमाणपत्र
अल्प उत्पन्न गट-
१. अधिवास प्रमाणपत्र- बारकोड अनिवार्य (माजी सैनिकांना सुट)
२. उत्पन्नाचा पुरावा
३. आधार कार्ड/ पॅन कार्ड
*संवैधानिक आरक्षण-*
• अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती / भटक्या जमाती/ विमुक्त जमाती प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र
आवश्यक-
दिव्यांग (शारीरिक विकलांगांसाठी)
दिव्यांग- शारीरिक विकलांगतेचे प्रमाणपत्र
गैर-संवैधानिक आरक्षण
१. माजी सैनिक आणि त्यांचे आश्रित तसेच निमलष्करी दल
२. शासन कर्मचारी
३. सिडको कर्मचारी
४. पत्रकार
५. धार्मिक अल्पसंख्याक
६. प्रकल्पग्रस्त व्यक्ती
७. शारीरिकदृष्ट्या अपंग
८. माथाडी कामगार
दस्तऐवजांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले सरकार केंद्र आणि मदत कक्ष
नोंदणीसाठी आवश्यक असलेले दस्तऐवज अचूक आणि वैध असणे महत्त्वाचे आहे. नोंदणी प्रक्रियेदरम्यान अर्जदारांना
काही अडचणी येत असल्यास, https://cidcohomes.com या संकेतस्थळावरून सिडकोशी संपर्क साधावा.
याशिवाय, अर्जदारांना सिडकोच्या कार्यालयातून सविस्तर मार्गदर्शन मिळू शकते. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक
करणे आणि अधिवास प्रमाणपत्रावर बारकोडचा अभाव अशा समस्यांसाठी मार्गदर्शन देण्यात येईल, त्याचप्रमाणे,
ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या समस्या व दस्तऐवजीकरणाचाबत कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी अर्जदार
आपले सरकार केंद्रास भेट देऊ शकतात. आपले सरकार केंद्रांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.