केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी घेतली माजी आमदार ॲड. सौ. हुस्नबानू खलिफेंची भेट…

Spread the love

शहरासह तालुक्याच्या विकासात्मक बाबींवर झाली चर्चा

राजापूर (प्रतिनिधी): मंगळवारी राजापूर दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांनी राजापुरात माजी आमदार ॲड. सौ. हुस्नबानू खलिफे यांची भेट घेतली. ॲड. सौ. खलिफे यांच्या कार्यालयात ना. राणे यांनी ॲड. सौ. खलिफे यांची भेट घेतली व राजापूर शहरासह तालुक्यातील एकूणच विकासात्मक कामांबाबत चर्चा केली.

ना. राणे यांनी मंगळवारी राजापुरात अनेक मान्यवरांच्या भेटी घेत त्यांच्याशी थेट संवाद साधला. ॲड सौ. खलिफे यांचे देखील राणे कुटुंबाशी कौटुंबीक संबध आहेत. राजकारणा पलिकडे नाती जपणारे नेतृत्व अशी ना. राणे यांची ओळख आहे. ॲड. सौ. खलिफे या मुळच्या कणकवलीच्या असून त्यांचे पुर्वीपासूनच राणे कुटुंबीयांशी कौटुंबीक संबध आहेत. मंगळवारी राणे यांनी ॲड. सौ. खलिफे यांच्या तहसीलदार कार्यालया जवळील कार्यालयात त्यांची भेट घेतली. यावेळी ना. राणे यांनी ॲड. सौ.खलिफे यांनी नगराध्यक्ष म्हणून शहरात केलेली विकास कामे, आमदार म्हणून केलेले काम यांसह अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष ॲड. जमिर खलिफे, माजी नगरसेवक सुलतान ठाकूर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजिम जैतापकर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page