उदय म्हणजे माझा विश्वास आहे – नारायण राणे…पटवर्धनवाडी येथे महायुतीच्या प्रचार सभेला उत्तम प्रतिसाद..

Spread the love

रत्नागिरी : सामंत कुटुंबियांशी आमचे चांगले संबंध आहेत, मी एकटा नाही. मला येथे धोका वाटत नाही. उदय म्हणजे माझा विश्वास आहे, मी अविश्वास ठेवून काम करत नाही. त्यामुळे रत्नागिरीतून जास्तीत जास्त मताधिक्य मिळणार आहे.

▪️मित्र असलेला व राज्याचे मंत्री उदय सामंत हे रत्नागिरीचा विकास करत आहेत. त्याच्या जोडीला मोदी सरकारच्या माध्यमातून रत्नागिरीचा सर्वांगिण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री, महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी केले.

▪️रविवारी सायंकाळी उद्यमनगर, पटवर्धनवाडी येथील लोकमान्य टिळक सभागृहात शहर प्रभाग क्रमांक २, ३, ४ मधील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी मंत्री उदय सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल
पंडित, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, माजी नगराध्यक्ष राजेश्वरी शेट्ये, भाजप महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, माजी उपनगराध्यक्ष सुदेश मयेकर, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर,राजन फाळके ,सुदेश मयेकर,माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी, भाजयुमोचे सरचिटणीस प्रवीण देसाई, कौशल्या शेट्ये, पल्लवी पाटील, नितीन गांगण, प्रसाद शेटये, प्रसाद बाष्टे यांच्यासमवेत अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मंत्री राणे म्हणाले की,.

▪️कोरोना काळात व्यवसाय, दुकाने, कारखाने बंद पडले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांना पुन्हा कामावर रुजू होण्याकरिता प्रयत्न केले. माझ्या खात्याला साडेपाच लक्ष कोटी रुपयांचा निधी दिला त्यातून कारखाने उभे राहिले व कामगारांना रोजगार मिळाला. मोदी जे सांगतात ते पूर्ण करतातच. २०४७ मध्ये शतक महोत्सव साजरा करताना भारत विकसित राष्ट्र होणार आहे.

मंत्री उदय सामंत म्हणाले की,.

▪️रत्नागिरीचा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार व मंत्री नारायण राणे यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. रत्नागिरीत विकासकाम सुरूच आहे. शहरालगतच्या उद्यमनगर येथे डिफेन्स क्लस्टर होणार आहे.

▪️राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी मिळत आहे. त्यातून विकासकामे सुरू आहेत. येणाऱ्या निवडणुकीत राणे साहेबांना विजयी करायचे आहे आणि त्यांना केंद्रात मंत्रीपदही मिळेल. त्यांच्याकडून हक्काने रत्नागिरीच्या विकासाची कामे करून घ्यायची आहेत.

यावेळी दोन तिन व चार प्रभागातील नागरिक, मतदार हजारो चे संख्येने उपस्थित होते..

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page