कोकण रेल्वेवर उद्या अडीच तासांचा मेगाब्लॉक..

Spread the love

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील निवसर-राजापूर विभागादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामांसाठी १० मे रोजी अडीच तासांच्या घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे ३ रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडणार आहे.

शुक्रवारी सकाळी ९.१० घेण्यात येणारा मेगाब्लॉक सकाळी ११.४० वाजता संपुष्टात येईल. या मेगाब्लॉकमुळे १०१०६ क्रमांकाची सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस १० मे रोजी सावंतवाडी येथून ४५ मिनिटे उशिराने म्हणजेच ८.४० ऐवजी ९.२५ वाजता सुटणार आहे. १२०५१ क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस १० मे रोजी रत्नागिरी-निवसर विभागादरम्यान ३० मिनिटे रोखण्यात येईल. याचदिवशी २२११९ क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकात २० मिनिटे थांबवण्यात येणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page