ठाणे, कळवा, मुंब्रा, दिव्यात गुरूवारी पाणी नाही.

Spread the love

गुरूवारी ठाण्यात पाणी नाही

ठाणे : निलेश घाग ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभागसमिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीचे कटाई नाका ते कल्याण फाटा येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेतल्यामुळे गुरुवार दि.०१ फेब्रू.२४ रात्री १२:०० ते शुक्रवार दि. ०२ फेब्रू.२४ रात्री १२:०० वाजेपर्यत एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. , नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील ते दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणीकपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगर पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page