
नेरळ /सुमित क्षीरसागर – नेरळ शिवसेना शिंदेगटात पदाचे राजीनामे सुरूच असून.याला शहर प्रमुखा विरोधात नाराजीचे सूर असल्याची चर्चा आहे.दरम्यान आता पंचायत समिती तर युवा पदाधिकारी यांनी जिल्ह्या प्रमुखाकडे आपले राजीनामे दिल्याची माहिती समोर आली.तर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शहर प्रमुख व जेष्ठ पदाधिकारी यांच्यात काही खटके उडाल्याचे देखील सांगण्यात आलं.मात्र शहर प्रमुख यांच्या ना कर्त्यापणामुळे नेरळ शहरात शिंदे शिवसेना गट अडचणीत सापडली.
उर्मट भाषा व खोडसाळ स्वभावामुळे कायम चर्चेत राहिलेले नेरळ शिंदे शिवसेना गटाचे शहर प्रमुख प्रभाकर देशमुख हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत.परंतु या चर्चेमुळे ते मात्र अडचणीत सापडल्याचे बोलले जात आहे.नेरळ शिवसेना शिंदे गटात मागील काही दिवसात पदाधिकारी यांचे राजीनामे सत्र सुरू झाल्याचे चित्र समोर असताना.आता आणखी काही पदाधिकारी यांनी पक्षावर नाराज होत आपल्या पक्षाचा राजीनामा हा शिवसेना जिल्ह्या प्रमुख संतोष भोईर तर तालुका प्रमुख भाई जगताप यांच्याकडे सोपविण्यात आल्याची खात्रीशीर माहिती समोर आली.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 23 जानेवारी रोजीच्या जयंतीदिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीला हा राजीनामा कार्यालयात दिल्याची माहिती आहे.दरम्यान हा राजीनामा नेरळ शहर प्रमुख देशमुख यांच्या कुरघोडी मुळे दिल्याचे समजतंय. याबाबत ही माहिती आमदार महेंद्र थोरवे यांच्या पासून देखील कार्यकर्त्यानी लपवली असल्याची चर्चा आहे.राजीनामा देण्यामध्ये एका युवा सैनिक पदाधिकारी तरुणाचा समावेश असून पंचायत समिती स्थरावर असणाऱ्या बड्या पदाधिकाऱ्याचा देखील यात समावेश असल्याची माहिती मिळाली.तर अन्य काही जेष्ठ शिवसैनिक तसेच युवक नाराज असून लवकरच राजीनामे देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान 23 जानेवारीच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी कार्यकर्त्यांची ही नाराजी उपस्थित पक्ष श्रेष्ठी समोर आली देखील होती त्यानंतर नाराज पदाधिकारी यांना पुढे घेण्यात आले होते.दरम्यान पक्ष श्रेष्ठीनी काही पदाधिकारी यांना लगेचच कर्जत येथील कार्यालयात बोलावून चर्चा केल्याचे समजतंय.
एकूणच प्रभाकर देशमुख यांच्यावर शिवसेना जेष्ठ पदाधिकारी यांनी नेरळ शहर प्रमुख पदाची जबाबदारी दिल्यानंतर संघटनेत अलबेल होतानाचे चित्र होते,त्यातच आता आणखीनच पक्षाअंतर्गत नाराजी कार्यकर्त्यांमध्ये वाढत चाललेल्याने येणाऱ्या काळात देशमुख यांच्यामुळे पक्षाला नेरळ शहरात मोठी किंमत चुकवावी लागू शकते म्हणून चर्चा.त्यामुळे आता पक्ष श्रेष्ठी देशमुख यांची पदावरून हकालपट्टी करणार का? की पक्ष संघटनेची हानी होताना पाहत बसणार म्हणून बोलले जात आहे.