उन्हाळ्यात दोडक्याची भाजी खाऊन मिळतील अनेक फायदे, शुगर आणि वजनही होईल कमी…..

Spread the love

डायबिटीस हा आजार जगभरात वेगाने वाढत आहे. भारताला तर डायबिटीसची राजधानी म्हटलं जातं. कारण इथे दिवसेंदिवस डायबिटीसच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. हा आजार अनेकदा अनुवांशिक असतो. तर कधी चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, चुकीच्या लाईफस्टाईलमुळेही होतो. लाईफस्टाईलमध्ये सुधार आणि चांगल्या आहाराच्या मदतीने डायबिटीस कंट्रोल केला जाऊ शकतो. अशात भोपळ्याऐवजी दोडक्याची भाजी जास्त फायदेशीर मानली जाते.

दोडक्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. यात डायटरी फायबर, आयर्न आणि व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम भरपूर असतं. तसेच यात कॅलरी कमी असतात. ही भाजी आरोग्यासाठी फार चांगली मानली जाते. याच्या सेवनाने अनेक आजारांचा धोका कमी केला जाऊ शकतो.

डॉक्टर सांगतात की, दोडक्याच्या भाजीचा आहारात समावेश केला तर अनेक फायदे मिळतात. ही भाजी डायबिटीसच्या रूग्णांसाठी औषधासारखी असते. याने आधी तर शरीरात शुगर मेटाबॉलिज्म वाढवलं जातं. दुसरं म्हणजे डायबिटीस मॅनेज करण्यासाठी मदत मिळते. तसेच डायबिटीसमध्ये होणारी बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. दोडक्याची भाजी फार हलकी मानली जाते. ही भाजी कोलेस्ट्रॉल रूग्णांसाठीही फायदेशीर मानली जाते.

🔹️दोडक्याच्या नियमित सेवनाने काविळ होण्याचा धोकाही कमी होतो…

▪️वजनही होतं कमी…

दोडक्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं. त्याशिवाय यात फायबरही भरपूर असतं. याने वजन कमी करण्यास मदत मिळते. फायबर भरपूर असल्याने याने पोट जास्त वेळ भरून राहतं. तसेच याने कॅलरीही वाढत नाहीत.

▪️त्वचेसाठीही फायदेशीर…

दोडक्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुणही असतात. याने त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळते. दोडक्यामधील पाणी त्वचेला आतून निरोगी ठेवतं. याच्या नियमित सेवनाने त्वचा उजळते.

▪️एनीमियापासून बचाव…

आयर्न, व्हिटॅमिन बी आणि सी भरपूर असल्याने दोडक्यामुळे एनीमियाचा धोकाही कमी होतो. आयर्न शरीरात हीमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतं. व्हिटॅमिन बी6 शरीरात रेड ब्लड सेल्स बनवण्यास मदत करतं. नियमितपणे दोडक्याचं सेवन केलं तर शरीरातील रक्ताची कमी दूर होते. तसेच ही भाजी खाल्ल्याने केसही हेल्दी राहतात आणि त्वचाही चांगली राहते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page