राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर;….

Spread the love

‘या’ दिवशी होणार मतदान नाशिक विभागाच्या एका जागेचा समावेश…

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.

विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ), किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दिनांक ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या निवडणुकीसाठी बुधवार, १५ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीकरिता बुधवार, २२ मे २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, २७ मे २०२४ अशी आहे. सोमवार, १० जून २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. गुरूवार, १३ जून २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक १८ जून २०२४ रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असून नुकतेच तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता उर्वरित टप्प्यातील मतदान १३, २०, २५ मे आणि १ जून रोजी होणार असून ४ जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे. मात्र, अशातच आता लोकसभेची निवडणूक सुरु असताना महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Legislative Council) चार जागांवरील निवडणूक जाहीर झाली आहे.

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या (Graduates and Teachers) निवडणुका (Election) जाहीर झाल्या असून यामध्ये मुंबई आणि कोकण पदवीधर व मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. या चारही मतदारसंघासाठी १० जूनला सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर १३ जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या या चारही मतदारसंघाच्या आमदारांचा कार्यकाळ ७ जुलै २०२४ रोजी संपणार असल्याने त्याआधी या निवडणुका होत आहेत.

दरम्यान, विधानपरिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी ७ सदस्य शिक्षक, तर ७ सदस्य पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने राज्यातील विधानपरिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

▪️असा आहे निवडणुक कार्यक्रम

▪️१५ ते २२ मे – अर्ज दाखल करण्याची मुदत
▪️२४ मे – अर्जाची छाननी
▪️२७ मे – माघार घेण्याची मुदत
▪️१० जून – मतदान
▪️१३ जून – मतमोजणी

🔹️या चार आमदारांचा कार्यकाळ संपणार

▪️विलास पोतनीस – मुंबई पदवीधर (ठाकरे गट)
▪️निरंजन देवखरे – कोकण पदवीधर (भाजप)
▪️किशोर दराडे – नाशिक शिक्षक (ठाकरे गट)
▪️कपिल पाटील – मुंबई शिक्षक (लोकभारती पक्ष)

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page