सखोल मिळालेल्या माहितीसाठी समारोप प्रसंगी प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केली कृतज्ञता!
श्रीकृष्ण खातू /धामणी – गेल्या काही महिन्यात नवनियुक्त झालेले संगमेश्वर तालुक्यातील सुमारे दोनशे प्राथमिक शिक्षकांचे राज्य व्यापी नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण देवरूख हायस्कुल येथे दि.४/११/२०२४ रोजी सुरू होऊन १०/११/२०२४ पर्यत चालू होते.या सात दिवसांच्या प्रशिक्षणाचा समारोप करताना प्रशिक्षणार्थी शिक्षक राहुल इंगळे यांच्या सुरेल व बहारदार बासरी वादन गायनांने सांगता करण्यात आली.
या कालावधीत वर्गात घेतलेल्या कृती,उपक्रम, तसेच विविध गोष्टींचा अनुभव घेतल्या नंतर त्याची झलक म्हणून मतदार जागृतीसंदेश रांगोळी रेखाटन, काव्य वाचन,बासरी वादन कला याप्रसंगी शिक्षकांनी उस्फूर्त सादर केल्या.
तसेच या प्रशिक्षणात मिळालेली विविध प्रकारची माहिती व ज्ञान याचा उपयोग आप आपल्या शाळेत नक्कीच करू, तसेच सात दिवस अगदी प्रामाणिक व प्रभावीपणे झालेले प्रशिक्षण हे चिरकाल स्मरणात राहील,अशा प्रकारची ग्वाही दिली. . मार्गदर्शक व स़ंबधीत पंचायत समिती शिक्षण विभाग तसेच समग्र शिक्षा अभियान इत्यादींचे उस्फूर्त मनोगतातूंन अनेक प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी कृतज्ञता व्यक्त करून धन्यवाद दिले.
या समारोप प्रसंगीं मार्गदर्शक समीर काबदुले, सौ.भिंगार्डे, श्रीकृष्ण खातू, संतोष चव्हाण, विनय होडे,सतीश वाकसे,सचिन सकपाळ,अजिंक्य नाफडे, केंद्र प्रमुख यादव, जाधव,माने,करंबेळे,अभिमन्यू शिंदे, तसेच होतेकर,देसाई,कांबळे,माईन,आदी मंडळी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सागर सर यांनी केले.