निकृष्ठ कामावर शासकीय अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर आणि साई कन्सल्टंट यांच्यावर कारवाईची मागणी….
संगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यामध्ये चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू आहे असे असतानाच संगमेश्वर जवळच्या निढळेवाडी येथे चौपदरीकरण हातानेच करण्यात येत आहे मात्र असे असतानाही शासकीय अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने संगमेश्वर तालुक्यातून संताप व्यक्त होत आहे. अशाच पद्धतीचे काम जे एम म्हात्रे कन्ट्रक्शन कडून यापूर्वी पुलापासून नागिरीच्या दिशेकडे दोन किलोमीटरचे काम झाले आहेत. तसेच कुरदुंडा येथील रेडी टू मिक्स सिमेंट प्लांट च्या समोरचा रस्ता आहे याच पद्धतीने हाताने करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचे काम करताना येथील नॅशनल हायवे अधिकाऱ्यांकडून वारंवार दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. सदरची तक्रार तोंडी स्वरूपात अनेक अनेकांकडून करण्यात आलेले आहेत परंतु जे एम मात्रे कंट्रक्शन व साई कन्सल्टंट यांच्यावर आज पर्यंत कोणती कारवाई करण्यात आलेली नाही.
जे एम म्हात्रे कंट्रक्शन कडून करण्यात येणारे ग्राम निष्कृष्ट दर्जाचे असून कंपनीवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी..
दरम्यान आरवली ते तळेघंटे हा सहाव्या टप्प्याचे काम कॉन्ट्रॅक्ट म्हणून जे मात्र कंट्रक्शन यांच्याकडे आहे. सदर हायवेचे काम निकृष्ट दर्जाचे करत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आरवली पासून तळेघंटेपर्यंत वापरण्यात आलेला मुरूम माती इन हायवे मधीलच नेतृत्व दर्जाची वापरण्यात आलेली आहे. सदर माती पाणी मारून बसवणे गरजेचे असतानाही तेही चांगल्या पद्धतीने पाणी मारून बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी हायवेचे काँक्रीट खचले आहे. अनेक ठिकाणी हायवेला धडे गेले आहेत. करोडो रुपये खर्च करून करण्यात येणारे काम हे थर्ड क्लास असून अधिकारी व साई कन्सल्टंट कॉलेटी कंट्रोल कंपनी यांना दिसून येत नाही हेच आश्चर्याची बाब आहे. कॉलिटी कंट्रोल कंपनीचे माणसे कधीही सदर कामाच्या ठिकाणी उपस्थित नसतात. सदर काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे म्हणून त्रयस्थ कंपनीला कामावर लक्ष ठेवून ते कॉलिटी चे काम करून घेण्यासाठी नेमण्यात आले आहे. परंतु सदरचे ठिकाणी कधीही त्यांची माणसे उपस्थित नसतात. त्यांच्या गाड्यांचा वापर प्रशासकीय अधिकारी करत असून त्यावरही कोणतीही कारवाई तक्रार करूनही आजपर्यंत करण्यात येत नाही.
हवेचे काम चालू असताना स्थानिक अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना त्रास देण्याचे काम चालू…
हवेचे काम चालू असताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचा काम हवे डिपार्टमेंट करून चालू आहे परंतु रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे चालू आहे त्याकडे जाणून-बुजून हे लोक दुर्लक्ष करतात. अशा प्रकारे शासनाच्या पैशाचा अपव्यय करणे कितपत योग्य आहे याचा विचार प्रशासन कधीतरी करणार का? अनेक ठिकाणी न्यायालयाचे प्रकरणे प्रलंबित असून असून त्यामध्ये हायवे डिपार्टमेंट सार्वजनिक बांधकाम विभाग देवरुख व उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांच्यामध्ये समावेश नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणींचे भूसंपादन त्यांचे काम आजही दिमागतीने चालू आहे. अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या कार्यपद्धतीनुसार काम न केल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे केसेस मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्या. त्याचे कारण मूळ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्हॅल्युएशन चे काम व मोजणीचे काम योग्य प्रकारे केले नाही. त्याचा मनस्ताप स्थानिक नागरिकांना झाला आहे. याला सर्वस्वी जबाबदार प्रशासकीय अधिकारी असून त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. भूसंपादनाचे काम एवढ्या विलंबाने का झाले याची सविस्तर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. तसेच अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी खरेदी केल्याने भूसंपादनाच्या विषयांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचेही अनेक ग्रामस्थांकडून भूसंपादनाच्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी ही मागणी करण्यात आली आहे.
हायवे काम चालू असताना स्थानिक नागरिकांची जे एम म्हात्रे कन्ट्रक्शन कंपनीकडून स्थानिकांची फसवणूक…
हायवे चे काम चालू असताना अनेक ठिकाणी स्थानिक लोकांकडून हवेसाठी लागणाऱ्या वस्तूंची भाडेतत्त्वावर मागणी करण्यात आलेली होती त्यानुसार स्थानिकांकडून वस्तू घेण्यात आला परंतु त्याचा योग्य मोबदला त्यांना देण्यात आलेले नाही. असेही भरपूर विषय जे एम म्हात्रे कंट्रक्शन कंपनीच्या बाबतीत लोकांना निदर्शनात आले आहेत. संगमेश्वरातील प्रतिष्ठित नागरिक रामदास आंबवकर यांच्याकडून कंपनीने भाडेतत्त्वावर जनरेटर घेतला होता. परंतु दोन वेळा कंपनीच्या चुकीमुळे जनरेटर कुठूनही त्यांचे भाडे देण्यात आलेले नाही. या विरुद्ध लेखी कंप्लेंट सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केल्यानंतर सदरचे पैसे देतो असे सांगितले होते परंतु आजपर्यंत एक रुपयाही कंट्रक्शन कंपनीकडून देण्यात आलेले नाही. सदर विषयांमध्ये मॅनेजर हलशेट याचा हलगर्जीपणा व हट्टीपणा कारणीभूत आहे असे आंबवकर यांनी सांगितले. असे अनेक जणांच्या बाबतीत विषय झालेले असून जे एम म्हात्रे कंट्रक्शन चे मालक यांची मजुरी समोर आली आहे. यासारखे अनेक विषय आता समोर येऊ लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या सूचनेचे पालन कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून करण्यात आलेले नाही हे कोकणी माणसाच्या दुर्दैव्य आहे.
कॉन्ट्रॅक्टर चुकीचा निवडल्यामुळे हवेची कॉस्ट वाढलेली आहे सदरचा उदंड कोकणी माणसांनी भरावा का?
गेली दहा वर्ष हवेचे काम हे कॉन्ट्रॅक्टरच्या निवड चुकीची झाल्याने झाले आहे तर हवेची वाढलेली रक्कम हे कोकणातील लोकांना भुर्दंड आहे सदर वाढीव रक्कम मूळ कॉन्ट्रॅक्टर कडून वसूल करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हवेची रक्कम दुप्पट होऊन त्यापेक्षा जास्त झाले आहे. त्याला जबाबदार प्रशासन आहे योग्य वेळी कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करू कॉन्ट्रॅक्टर चेंज केला असता तर हा वाढीव खर्च नागरिकांना भरावा लागला नसता अशी कोकणी चाकरमान्यांची म्हणणे आहे आणि ते योग्यही आहे. आज पर्यंत सदरच्या टप्प्यातील कामाला तीन-तीन कॉन्ट्रॅक्टर झाले. तर मग व्यवस्थित कॉन्ट्रॅक्टर नेमणे ही जिम्मेदारी प्रशासकीय अधिकारी व मंत्री महोदयांची होती. मग कोकणी माणसाने सदरचे पैसे टोलच्या स्वरूपात का भरावे असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हवेचे काम हाताने चालू जे. एम. मात्रे कंट्रक्शन कंपनीचा अजब कारभार.. प्रशासनाचे दुर्लक्ष..
गेले दहा वर्ष रखडलेल्या चौपदरीकरणाचे काम संगमेश्वर तालुक्यात धीम्या गतीने सुरू आहे. चौपदरीकरणाच्या रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. निडळेवाडी येथे चक्क यांत्रिक मशीन न वापरता हातानेच चौपदरीकरण करण्यात येत आहे. चौपदरीकरणाचे काम करत असताना शासकीय अधिकारी असणे गरजेचे असते . परंतु सदर ठिकाणी नॅशनल हायवेच्या अधिकारी कधीही कामाच्या ठिकाणी हजर नसतात . कॉलिटी कंट्रोल चे काम साई कन्सल्टंट या गुजरातच्या कंपनीला मिळाले असून हवेचे काम चालू झाल्यापासून तर ठिकाणी उपस्थित नसतात . त्यामुळे जे एम म्हात्रे कंट्रक्शन कंपनीचा मनमानी कारभार चालू आहे. शासकीय अधिकाऱ्यांचा वर जास्त असल्याशिवाय अशा पद्धतीने कामे करणे शक्य नाही. असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी शासकीय अधिकारीच सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवासी आणि वाहन चालक यांनी केलेला आहे. अनेक वेळा सांगूनही शासकीय अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे निधळेवाडी येथे सुरू असलेल्या निकृष्ट कामाबाबत शासकीय अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देण्याची मागणी होत आहे तसे न केल्यास जनता रस्त्यावर उतरेल असे ग्रामस्थांनी सांगितले आहे. हवेचे काम चालू असताना यांच्याकडून कॉलिटी कंट्रोल म्हणून नेमणूक झालेले असतानाही कधीही कामाच्या ठिकाणी त्यांच्या अधिकारी उपस्थित नसतात. होणाऱ्या निष्कृष्ट कामाला साई कन्सल्टंट ही कंपनी जबाबदार असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. अशी लेखी कम्प्लेंट गडकरींकडे पत्रकार मित्रपरिवार यांच्याकडून करण्यात येणार आहे. हवेचे काम चालू असताना यापूर्वी गाव मळा एसटी स्टॉप शेजारी फुल येथून दोन किलोमीटरच्या पेक्षा जास्ती रस्ता हाताने करण्यात आलेला आहे. तसेच सदर पुलाचे स्लॅप हाताने टाकण्यात आलेला आहे. वरून सदर काम किती निष्कृष्ट दर्जाचे आहे हे दिसून येते. तसेच उदंड येथील जे एम म्हात्रे कंट्रक्शन कंपनीच्या रेडी टू मिक्स सिमेंट काँक्रेट प्लांटच्या समोरही जवळजवळ तीन किलोमीटरचा रस्ता हाताने करण्यात आलेला आहे त्यावेळीही अनेक लोकांनी तक्रार केल्या होत्या परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. करोडो रुपयांचा खर्च करून आजही कोकणी माणसाला प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे काम निकृष्ट दर्जाचे पदरी पडत आहे. लवकरच या संदर्भामध्ये लेखी निवेदन नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात येणार आहे.