
*देवरुख-* देवरूखातील देवेंद्र प्रकाश पेंढारी व ऋणिता देवेंद्र पेंढारी या दाम्पत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे ‘हाँटेल माऊली’ या नावाने हाँटेल व्यवसाय सुरू केला आहे. या हाँटेलचे उद्घाटन श्री. महादेव जंगम स्वामी यांच्याहस्ते मंगळवारी करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी बिल्डींगचे मालक मनोहर सुर्वे, तुकाराम गोंधळी, पेंढारी कुटुंबिय, आदिंसह अन्य मान्यवर उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे देवरूख शहराध्यक्ष हनिफ हरचिरकर, बाळू ढवळे, प्रफुल भुवड, नितीन भोसले, राजू वणकुंद्रे, देवरूख हायस्कूलचे शिक्षक, मित्रपरिवार यांनी देवेंद्र प्रकाश पेंढारी व ऋणिता देवेंद्र पेंढारी या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.