घे भरारी ग्राम संघाच्या महिला बचत गटातील महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न ….

Spread the love

*संगमेश्वर वार्ताहर –* जागतिक महिला दिनानिमित्त संगमेश्वर येथील घे भरारी ग्राम संघाच्या महिला बचत गटातील महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी उत्साहात संपन्न झाले.
प्रथम सौ अमृता कोकाटे यांनी घे भरारी ग्राम संघाच्या अध्यक्षा सौ.प्रिया सावंत, संगमेश्वर नावडी सरपंच सौ.प्रज्ञा कोळवणकर कोषाध्यक्ष आर्या मयेकर सचिव अनुश्री शेट्ये, सीआरपी मनाली सुर्वे,  दीप्ती मुरकर, बँक सखी सानिका कदम यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.



या सांस्कृतिक  कार्यक्रमांमध्ये स्वागत गीताने सुरुवात करण्यात आली.विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये होते. आमचं यो कोकण या नृत्यातून कोकणातील सण वैशिष्ट्ये दाखवणारे अप्रतिम नृत्य ज्येष्ठ महिलांनी सादर केले. स्त्रीला कोणताही त्रास देऊ नये, घरातील लक्ष्मी म्हणून तिचा आदर ठेवावा हे समाजाला कळण्यासाठी  अक्कल येऊ दे या विनोदी भारुडातून सुंदर असा सादरीकरण केलं गेलं.



सध्या पुष्पा चा जमाना असल्यामुळे पुष्पावर गाणं घेऊन अप्रतिम नृत्य महिलांनी सादर केलं त्यामध्ये सुप्रिया शेट्ये यांनी पुष्पाची भूमिका अप्रतिमपणे सादर केली त्यासाठी वन्स मोअर घेऊन रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.

लोकनृत्यातील आदिवासी नृत्य अंबा बाजला गो,  कुपारी समाजातील या बागेचा कोण माळी, थांब थांब कासारा, सावर सावर अंबाबाई , नागीण,  भुताने झपाटलं अशे वैविध्यपूर्ण  मराठी नृत्य सादरीकरण 15 महिलांनी मिळून  अप्रतिमपणे केलं. जुनी मराठी गाणी रिमिक्स,  हिंदी गाणी रिमिक्स,  फुलवंती, आपलम चपलम, मैया यशोदा अशा नृत्या वरती सुद्धा अप्रतिम सादरीकरण केलं. कार्यक्रमांमध्ये एकूण वीस वेगवेगळ्या कार्यक्रमाचा समावेश होता.

कार्यक्रमातील नृत्य दिग्दर्शन  सौ. अमृता राहुल कोकाटे ( शेट्ये )यांनी केले. या कार्यक्रमातून लोककला जपण्याचा प्रयत्न करावा हा उद्देश सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला असे दिसून आले   व अनेक स्त्री कलाकार यामधून पुढे येत आहेत. संगमेश्वर सारख्या छोट्या गावामध्ये  अनेक स्त्री कलाकार आहेत पण त्यांना आपली कला सिद्ध करण्यासाठी जागतिक महिला दिन हा दिवस म्हणजे एक सुंदर रंगमंच उपलब्ध झालेला आहे.


  जागतिक महिला दिनानिमित्त सौ.अमृता राहुल कोकाटे यांच्या गेल्या अकरा वर्षातील सामाजिक कार्याबद्दल आणि त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारासाठी जयसिंगपूर येथील पत्रकार श्री. प्रशांत पोवळे तसेच सांगली येथील ज्येष्ठ कवी सिताराम सुत बाळासाहेब बेलवलकर लिखित सौ. अर्चिता राहुल कोकाटे यांच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर आधारित ” काव्य गौरव सन्मानपत्र ” प्रमुख पाहुण्या सौ.गितांजली सावंत कार्याध्यक्ष शिक्षण संस्था किरबेट व ज्येष्ठ महिला श्रीमती प्रफुल ताई नागवेकर यांच्या शुभहस्ते सौ.अर्चिता कोकाटे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांची आई सौ अर्चना अनिल शेट्ये आणि  मुलगी आर्या उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रियदर्शनी भगिनी मंडळाच्या माजी अध्यक्ष सौ कुमुद शेट्ये यांनी  या महिलांना भेटवस्तू देऊन  कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. सौ कुमुद शेट्ये यांनी या महिलांना नवरात्र मध्ये रत्नागिरी वैश्यवाणी समाजाच्या राधाकृष्ण मंदिर मध्ये  कार्यक्रम सादरीकरणासाठी बोलावून त्यांना कला सादरीकरणासाठी व्यासपीठ  उपलब्ध करून दिले होते त्यासाठी  सौ नयना शेट्ये यांनी  येतोचित सन्मान केला. यावेळी सौ कुमुद शेट्ये यांची मुलगी प्रीती शेट्ये व त्यांचं कुटुंबीय उपस्थित होते.
2019 पासून या महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास सुरुवात केली सलग 8 वर्ष या महिला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात तसे श्रावणातील मंगळागौर स्पर्धेमध्ये संगमेश्वर विभागातून तीन वेळा त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे त्यासाठी सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. संगमेश्वर सारख्या छोट्या शहरांमध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम फार कमी प्रमाणात येतात.  पूर्वी पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या रंगमंचावर  नाटकाचे प्रयोग होत होते.  पण आता नाटकाचे प्रयोग हे रत्नागिरी चिपळूणसारख्या मोठ्या शहरांमध्येच होतात.  त्यामुळे या  सुंदर सादरीकरणातून संगमेश्वर वासियांना मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहण्याची एक उत्तम संधी या महिलांनी उपलब्ध करून दिली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ दीप्ती गद्रे यांनीही या महिलांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमांमध्ये सौ.अमृता कोकाटे, सौ. जानवी चिचकर, सौ. सविता हळदकर सौ. सुविधा शेट्ये, सौ.सानिका कदम सौ. सुप्रिया कदम  सौ. नयना शेट्ये, सौ.नम्रता शेट्ये, सौ.प्रिया शेट्ये, सौ मनीषा चव्हाण सौ कुष्टे, सौ आर्या मयेकर, सौ.योगिनी डोंगरे सौ. जंगम,  सौ सुप्रिया शेट्ये सौ. चैत्राली खातू, सौ.वैशाली मुरकर सौ.ज्योती चिचकर सौ.दिप्ती मुरकर आणि सौ भाटकर या महिला सहभागी होत्या.
हा कार्यक्रम नावडी येथील आठवडा बाजारातील पैसा फंड स्कूलच्या जागेतील रंगमंचावर उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी पैसा फंड इंग्लिश स्कूलचे संस्थाध्यक्ष मा. श्री अनिल शेठ शेट्ये यांनी  जागा उपलब्ध करून दिली, तसेच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व महिला पोलीस यांचेही सहकार्य लाभले.
फोटोग्राफर राधेय सुर्वे साऊंड आणि मंडप डेकोरेटर पावस्कर, आणि नेहमी सहकार्य करणारे सर्व पत्रकार बंधू  यां सर्वांचे आभार मानण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अमृता कोकाटे,  सौ अनुश्री शेट्ये सौ.योगिनी डोंगरे यांनी केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page