आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्राचे वितरण…

Spread the love

*देवरूख-* तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या जागतिक ब्लॅक बेल्ट परीक्षेचे बेल्ट प्रमाणपत्र वितरण व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी व नगरपंचायत तायक्वांडो क्लब यांच्या वतीने झालेल्या बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचे बेल्ट वितरण तालुक्याचे आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, नगरपंचायतचे मुख्याधिकारी चेतन विसपुते, माजी सभापती संतोष लाड, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, प्रियदर्शनी पतसंस्थेचे चेअरमन हनीफ शेठ हरचीरकर,माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड,माजी नगरसेवक यशवंत गोपाळ,बाळू ढवळे, राजू वनकुंद्रे,पंकज पुसाळकर,क्लब अध्यक्षा सौ.स्मिता लाड, उपाध्यक्षा ॲ.पुनम चव्हाण,उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, तालुक्याचे प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, सुमीत पवार, गायत्री शिंदे, पालक प्रतिनिधी आदिती लोध व पालक वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे-अथर्व यादव,आयुष वाजे,आद्वित नार्वेकर, पीयुष सागवेकर,साहिल जागुष्टे,राहुल चव्हाण,स्वराली शिंदे,आर्या कोळपे,नेहा सावंत,दुर्वा जाधव,ईशा रेडिज,कनका नोन्हारे म,ऋतू करांजलकर,समृद्धी घडशी,सान्वी  जागुष्टे, समिक्षा पाटिल,सिया सागवेकर,श्रावणी इप्ते ,सार्थी धावडे,सुमित पवार,धनंजय जाधव,तनुश्री नारकर,साहिल घडशी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
    
बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये यशस्वी झालेले तायक्वांडो पट्टू पुढीलप्रमाणे – *येलो* – ईरा प्रभुदेसाई, सई संसारे, गार्गी शिर्के, तनिष्का कांगने,रुद्र वाडकर *ग्रीन* – कृष्णा गवानकर,शर्विल कांगने,कौस्तुभ बोटके,तनय थरवळ,सांस्कृति कांगने,स्वानंदि कांगने,स्वराज शिंदे, आराध्य कुष्टे, शुभ्रा सुर्वे, अनवय कोळवनकर, यश तांबे,आरोही तांबे.*ग्रीन- वन* – यज्ञा गजबार, हर्षदा कुंभार, ईशान भागवत, वरद शेट्ये, अबीर शेट्ये.*ब्ल्यु* – यशराज कटके, पृथ्वीराज कटके, आदित्य चिपळूणकर,सोनल शिंदे, वेद पटेल.*ब्ल्यू-वन* – नक्षत्रा शिंदे, मल्हार साने, वेदिका वाडकर.*रेड* – लक्ष्मी मोघे, वेदांत मसुरकर, ध्रुवा शिंदे, सोहम पवार, सोहम मालगुंडकर, प्रथमेश शेट्ये.*रेड-वन* – पूर्वा वनकर, दुर्गा मोघे, सोमांश सावंत. *ब्लॅक बेल्ट*-मृणाल मोहिरे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
    
यावेळी आमदार शेखर निकम यांनी आमदार झाल्यावर प्रथमच तायक्वांडो क्लबला भेट दिल्याबद्दल तायक्वांडो क्लबच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रोहन बने यांना पुढारी आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल तायक्वांडो क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांना बॅरीष्टनाथ पै.सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. व्यासपीठावरून बोलताना जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने यांनी 25 वर्षाच्या तायक्वांडो खेळाच्या वाटचाली बद्दल समाधान व्यक्त केले अध्यक्ष भाषणात बोलताना आमदार शेखर निकम यांनी तायक्वांडो खेळाच्या अडचणी लक्षात घेऊन त्या तातडीने मार्गी लावण्याबाबत नगरपंचायतचे मुख्याधिकारी चेतन विसपुते यांना सूचना केल्या व लवकरच तायक्वांडो खेळाची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याची तयारी करण्याबाबत तायक्वांडो कार्यकरणीला सांगितले. या सर्व यशस्वी तायक्वांडोपट्टुंना तालुका अँकॅडमीचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ. सुभाष बने, माजी राज्यमंत्री रविंद्र माने,जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व राज्य संघटना खजिनदार व्यंकटेशश्वरराव कर्रा,माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये,तालुका अकॅडमीचे उपाध्यक्ष परेश खातू,टेक्निकल प्रमुख चिन्मय साने,क्लब सदस्या स्वाती नारकर,अण्णा बेर्डे,दत्तात्रय भस्मे,सिनियर खेळाडू निखिल लाड,सौरभ वनकर,पंकज मेस्त्री सिद्धी केदारी, वेदांत गिडीये आदींनी शुभेच्छा दिल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page