
*संगमेश्वर –* एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प देवरुख अंतर्गत बुरंबी बीट मधील नावडी रामपेठ संगमेश्वर येथे चिमुकल्या मुलांच्या वार्षिक स्नेहसंमेलनात कार्यक्रमामध्ये “बेटी बचाओ बेटी पढाओ”या उपक्रमांतर्गत ” लेक लाडकी” या योजनेचा लाभ घेतलेल्या पालकांचा सत्कार संगमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी अंगणवाडी सेविका पल्लवी शेरे व मदतनीस शीतल अंब्रे यांनी चार लाभार्थ्यांना ” लेक लाडकी ” हा लाभ मिळवून दिल्या बद्दल शासन स्तरावरून उत्कृष्ट सामाजिक सेवा कार्य होत असल्याबाबत पोलीस निरीक्षक यादव यांनी त्यांचा व एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे कौतुक करून प्रशंसोदगार काढले. व पुढील सेवा व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी मंचावर नावडी सरपंचा प्रज्ञा कोळवणकर, उपसरपंच विवेक शेरे ,ग्रामपंचायत सदस्या प्रतिक्षा शेरे,मानसी अंब्रे, योगिनी डोंगरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीकृष्ण खातू ,पत्रकार वहाब दळवी, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे, जनार्दन शिरगावकर, दिनेश अंब्रे,संजय रेडीज, ज्येष्ठ नागरिक दादा कोळवणकर, प्रमोद शेट्ये, उदय संसारे, कासम खान, पोलीस पाटील अंगराज कोळवणकर, डॉ. अमोल भिंगार्डे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष सुर्वे , बचत गट अध्यक्षा प्रिया सावंत, बँक सखी सानिका कदम , सिद्धी पाथरे, माधुरी कुचेकर ,दक्षता समिती सदस्या अर्चिता कोकाटे,” लेक लाडकी” लाभार्थी मारिया मापारी, आप्रिन मापारी,अलिजा पठाण, सई पवार , इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन शिंदे यांनी केले.