ठाणे : निलेश घाग दिव्यातील साबेगाव जवळील खाडीत मुख्य नाल्यात भराव टाकून नैसर्गिक नाला बंद केल्याने ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून दिवा शहरात पाणी घुसण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अशा लोकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे.
साबेगाव येथील डीजे कॉम्प्लेक्स परिसरातील खाडीकडे जाणारा मुख्य नाला भराव टाकून बुजवण्यात आला आहे.याबाबतचा व्हिडीओ ठाकरे गटाकडून समोर आणण्यात आला आहे. या ठिकाणी दोन सिमेंटच्या मोऱ्या टाकून वरून माती टाकून हा नाला बुजवल्याने दिवा शहरातून खाडीच्या दिशेने जाणारे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होणार आहे.पावसाळ्यात यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आधीच दिवा शहरात नाल्यांची संख्या कमी असल्याने व असलेले नाले बुजवले गेल्याने पाणी भरण्याचे प्रमाण जास्त असते. पावसाळ्यात नागरिकांना घरात पाणी घुसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असणारे नैसर्गिक नाले बुजवले जाऊ नयेत, त्या नाल्यांचे रुंदीकरण व्हावं अशी शिवसेनेच्या ठाकरे गटाची मागणी आहे. जे नाले बुजवून अशा पद्धतीने नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करत आहेत,त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे.ठाकरेंच्या शिवसैनिकांनी सदर जागेची पाहणी केली यावेळी शहर प्रमुख सचिन पाटील शहर संघटक रोहिदास मुंडे उपशहर प्रमुख तेजस पोरजी महिला शहर संघटिका ज्योती पाटील युवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर
विभाग प्रमुख चेतन पाटील राजेश भोईर मच्छिद्र लाड संजय जाधव नागेश पवार शनिदास पाटील साईदास पाटील यांनी पाहणी दौरा करून याबाबत आवाज उठवला आहे.
जाहिरात