ठाकरे गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार, तीन खासदारांसह सहा जण नेतेपदी,

Spread the love

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकारिणीचा विस्तार केला. सहा नवे नेते तसेच उपनेते व संघटकपदी नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील पक्षवाढीस बळकटी मिळावी यासाठी नव्या नियुक्त्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मातोश्री’ निवासस्थानी काल सकाळी झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या नव्या नेत्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू यांची नेतेपदी नियुक्ती करून शिवसेना नेते मंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.

नेते मंडळ

मनोहर जोशी
लीलाधर डाके
दिवाकर रावते
सुभाष देसाई

आदित्य ठाकरे
संजय राऊत
चंद्रकांत खैरे
अनंत गीते
अरविंद सावंत
भास्कर जाधव

नवीन नियुक्त नेते

विनायक राऊत
अनिल देसाई
अनिल परब
राजन विचारे
रवींद्र वायकर
सुनील प्रभू

उपनेते

संजय पवार (कोल्हापूर)
राजुल पटेल (मुंबई)
विजय (खंड्या) साळवी (कल्याण)
संजय (बंडू) जाधव (परभणी)
शीतल देवरुखकर (मुंबई)
शरद कोळी (सोलापूर)

संघटक

अस्मिता गायकवाड (सोलापूर)
शुभांगी पाटील (नाशिक)
जान्हवी सावंत (कोकण)
छाया शिंदे (सातारा)
विलास वाव्हळ (मुंबई)
विलास रूपवते (मुंबई)
चेतन कांबळे (संभाजीनगर)

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page