कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज फेम सुनील बेंडखळे यांना मराठी नाट्य परिषदेचा यंदाचा मानाचा “उत्कृष्ट लोककलावंत” पुरस्कार जाहीर…

Spread the love

धामणी- कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज ह्या रत्नागिरीतील लोकप्रिय कार्यक्रमाचे निर्माते व रत्नागिरीतील प्रसिद्ध कलाकार लोककलावंत अभिनेता सुनील बेंडखळे यांना मराठी नाट्य परिषदेचा यंदाचा मानाचा “उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार जाहीर झाला आहे.

▪️कोकणातील लोककला, कोकणी बोलीभाषा, संस्कृती, परंपरांचा “कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज” लोकनाट्याद्वारे सुनील बेंडखळे यांनी प्रचार, प्रसाराचे काम केले. तसेच विनोदी बाजाने लोकांचे जीवन सुखकर केले. बेंडखळे यांचे हे कार्य लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृती प्रित्यर्थ 14 जूनला कै.शाहीर साबळे, कै. सुधीर भट, कै. स्मिता तळवलकर, कै. आनंद अभ्यंकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार सुनील बेंडखळे यांना जाहीर झाला आहे.

▪️सुनील बेंडखळे हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे कार्यकारणी सदस्य आहेत.

▪️सदर मिळालेल्या पुरस्काराबद्दल नाट्य परिषद रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष ना. उदय सामंत यांनी बेंडखळे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

▪️दिनांक 14 जून रोजी सायंकाळी 4 वाजता यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सुनील बेंडखळे यांनी कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज या लोकनाट्याचे मुंबईसह संपूर्ण कोकणात आत्तापर्यंत जवळपास 450 प्रयोग सादर केले आहेत.

▪️रत्नागिरीतील स्टार थिएटरच्या माध्यमातून आपली नाट्य कला जोपासण्यास सुरुवात केली, अनेक नाटके, एकांकिका, शॉर्ट फिल्म, वेबसिरीज, सिनेमांमधून सुनील यांनी आपला अभिनय सादर केला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page