राष्ट्र सेवा दल आणि परिवर्तन आयोजित भव्य चित्रकला उत्स्फूर्त प्रतिसाद…

Spread the love

मुंबई – (प्रसाद महाडीक / शांताराम गुडेकर)
प्रा.मधु दंडवते आणि साथी लक्ष्मण जाधव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्र सेवा दल आणि परिवर्तन मुंबई यांच्या वतीने आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन रविवारी नरेपार्क मैदान परेल येथे करण्यात आले होते.या स्पर्धेची सुरुवात साने गुरुजी यांच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या गीताने करण्यात आली. यावेळी प्रा. मधु दंडवते यांच्या तसबिरीस अनिल गंगर तर साथी लक्ष्मण जाधव यांच्या तसबिरीस जवाहर नागोरी यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. या स्पर्धेला मुंबईतील ६५ शाळांतील जवळपास २५०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धा संपल्यावर दीड तासांनी करण्यात आला. यात ६० स्पर्धकांना गौरविण्यात आले.
या सर्वं विजयी स्पर्धकाना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि त्यांचंच चित्र फ्रेम करून देण्यात आलं.

या स्पर्धेचे विजयी स्पर्धक निवडण्यासाठी निलेश घागरे यांच्या नेतृत्वाखाली २० परीक्षकांनी आपले योगदान दिले. या स्पर्धेला मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ट्रस्टी कल्पना देसाई, अपना बाजारचे अध्यक्ष श्रीपाद फाटक, उपाध्यक्ष अनिल गंगर, कार्यकारी संचालक विश्वनाथ मलुष्टे, संतोष सरफरे, संचालक शरद फाटक, अनिल ठाकूर, अपना बँकेचे अध्यक्ष अविनाश सरफरे, संचालक महेश मलुष्टे, लालबागचा राजाचे सरचिटणीस सुधीर साळवी, माजी नगरसेवक सचिन पडवळ, शाखाप्रमुख मिनार नाठाळकर, बेस्ट कामगारांचे नेते सुहास नलावडे, म्युनिसिपल कामगारांचे नेते रमाकांत बने, गोदी कामगारांचे नेते मारुती विश्वासराव, के. इ. एम च्या नेप्रॉलोजी डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. तुकाराम जमाले, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रमोद निगुडकर, ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते जवाहर नागोरी, सुहास कोते आदी उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिवर्तनच्या अध्यक्षा सारिका साळुंके, सरचिटणीस केतन कदम, प्रमुख कार्यकर्ते राजेश मोरे, राज तोरसकर, वैशाली साळुंखे, स्वप्नील कदम, अविनाश बने, प्रवीण सुखी, हेमंत बिडवे यांनी विशेष प्रयत्न केले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन सुधीर वाणी यांनी केले. त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत जवळपास दीडशे कार्यकर्त्यांचा जोश कायम ठेवला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page