दिनांक 21 डिसेंबर 2023 गुरुवार जाणून घेऊया’या’ राशीच्या व्यक्तींना दांपत्य जीवनात सुख समाधान मिळेल; वाचा राशीभविष्य…

Spread the love

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 21 डिसेंबर 2023 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

मेष-

21 डिसेंबर 2023 गुरूवार च्या दिवशी चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज आपला कल धार्मिकता व गूढ विद्या ह्याकडे होईल. द्विधा मनामुळे ठाम निर्णय आपण घेऊ शकणार नाही. शक्यतो आज आर्थिक देवाण – घेवाण करू नका. शारीरिक व मानसिक बेचैनी राहील. मंगल कार्यावर पैसा खर्च होईल. विदेशातील स्नेह्यांकडून बातम्या प्राप्त होतील.

वृषभ-

21 डिसेंबर 2023 गुरूवार च्या दिवशी चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आज व्यापारात वृद्धी होण्या बरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारी व मित्र ह्यांच्याकडून लाभ व सुखद क्षण लाभतील. दांपत्य जीवनात सुख समाधान मिळेल. पर्यटनाचे बेत आखाल. महिला वर्गाकडून लाभ होतील व मान – सन्मान मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. संतती कडून आनंददायी बातम्या मिळतील.

मिथुन-

21 डिसेंबर 2023 गुरूवार च्या दिवशी चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आज शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. नोकरी – व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असे वाटेल. वरिष्ठ प्रोत्साहन देतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. पित्या कडून लाभ होईल. सरकारी काम पूर्ण होण्यात अडचणी येणार नाहीत. दांपत्य जीवनात सुख, आनंद मिळेल.

कर्क-

21 डिसेंबर 2023 गुरूवार च्या दिवशी चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुखद बातम्या येतील. मंगल कार्य, प्रवास ह्यामुळे आपल्या आनंदात भर पडेल. कुटुंबियांसह चांगल्या प्रकारे वेळ जाईल. परदेशगमनाची इच्छा बाळगणारे, तसेच नोकरदारांना लाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह-

21 डिसेंबर 2023 गुरूवार च्या दिवशी चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. धार्मिक किंवा मंगल कार्यात आपणास सहभागी व्हावे लागेल. प्रवास संभवतात. आज आपला संताप वाढल्याने आपले मन अशांत होईल. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आज व्यवसायात अडथळा येईल. परदेशातील आप्तांकडून खुषालीची बातमी मिळेल.

कन्या-

21 डिसेंबर 2023 गुरूवार च्या दिवशी चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. सामाजिक व अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल. उंची वस्त्रे व अलंकाराची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल. भागीदारांशी चांगले संबंध राहातील. पती – पत्नीतील दुरावा संपून जवळीक निर्माण होईल.

तूळ-

21 डिसेंबर 2023 गुरूवार च्या दिवशी चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. घरातील सुखा – समाधानाचे वातावरण आपला आनंद वाढीस लावेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कामात यश प्राप्ती होईल. माता – पिता ह्यांच्या कडून काही चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल

वृश्चिक-

21 डिसेंबर 2023 गुरूवार च्या दिवशी चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आज शक्यतो प्रवासाचे आयोजन करू नये. आरोग्य विषयक चिंता निर्माण होईल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बौद्धिक चर्चा किंवा वादविवाद ह्यात सहभागी न होणे हितावह राहील. शेअर – सट्टा यांचे आकर्षण हानी करेल.

धनू-

21 डिसेंबर 2023 गुरूवार च्या दिवशी चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज जास्त संवेदनशीलते मुळे कौटुंबिक गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने पण दिवस चांगाल नाही. आईच्या तब्बेती विषयी विशेष खबरदारी घ्यावी लागेल. निद्रानाशाचा त्रास होईल. जलाशया पासून जपून राहणे हिताचे ठरेल.

मकर-

21 डिसेंबर 2023 गुरूवार च्या दिवशी चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज आपण शत्रूला पराभूत कराल. नवीन कार्यारंभासाठी तयार राहावे लागेल. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. व्यापार – व्यवसायात लाभ होईल. शेअर – सट्ट्यातील गुंतवणूक लाभ देईल. मित्र, स्वकीय व भावंडे यांच्याशी चांगले मेतकूट जमेल. मनाची तगमग दूर होईल. विद्यार्थ्यांना प्राविण्य प्राप्त होईल.

कुंभ-

21 डिसेंबर 2023 गुरूवार च्या दिवशी चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणताही ठोस निर्णय आपण घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. वाणीवर ताबा न राहिल्याने कुटुंबियांशी मतभेद होतील. मंगल कार्यावर खर्च होईल. प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नकारात्मक विचार दूर करा.

मीन-

21 डिसेंबर 2023 गुरूवार च्या दिवशी चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस आनंद व उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे. नातलग, संबंधित व मित्र यांच्याशी भेट – संवाद घडतील. त्यांच्या समवेत बाहेर फिरायला वा जेवणासाठी जाण्याची संधी येईल. प्रवासाची शक्यता आहे. तन – मनाने प्रसन्न राहाल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page