अजित पवार एकटे आणि सुप्रिया सुळे यांची ताकद वाढताना दिसत आहे. कारण नणंद भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री झाली आहे. अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरल्या आहेत.
नणंद-भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री, अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारात..
लोकसभा निवडणूक 2024 मधील सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा असलेला मतदार संघ म्हणजे बारामती. पवार कुटुंबातील या लढतीकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि सत्तेसोबत पुढे गेल्यानंतर पवार कुटुंबातील सत्तेचा आखाडा आता निवडणुकीच्या मैदानात दिसून येतोय. बारामतीमध्ये नंणद भावजयांची या लढत अजित पवार एकटे पडत चालले आहेत. कारण पवार कुटुंबातील अजून एका सदस्याने नंणदला साथ देण्याचं ठरवलंय. नुसतं ठरवलं नाही तर आज त्या मैदानात उतरून सुप्रिया सुळेंसाठी प्रचार केला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजयीमधल्या लढाईत आता वहिनींची एन्ट्री झालीय. अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी शर्मिला पवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उतरल्या आहेत. शर्मिला पवार या अजित पवारांचे छोटे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत. सुप्रिया सुळे भावजय असल्यामुळे माझी तिला कायम मदत राहणार आहे असं शर्मिला पवारांनी जाहीर घोषित केलंय. बारामतीतील उद्धट गावात त्यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक जणांना सभांना जाऊ नका, धमक्यांचे फोन येतात, मात्र त्याला बळी न पडता सुप्रिया सुळेंनाच मतदान करण्याचं आवाहन शर्मिला पवार यांनी केलंय. त्यामुळे त्या लेकीला, माहेरवाशिणीला पुन्हा एकदा संधी द्यावी, अशी विनंतीही त्यांनी मतदारांना यावेळी केली.
दीर अजित पवारांना टोला..!..
वहिनी शर्मिला पवार यांनी नंणद सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार केला खरा पण त्याच वेळी दीर अजित पवार यांची कानउघडणी केली. त्या म्हणाल्या की, चुलतेच्या पुढे नाही जायचं. तू काहीही हो तू सरपंच हो पंतप्रधान हो प्रेसिडेंट हो पण तू काही हो.. पण शेवटी वडील ते वडील आणि चुलता तो चुलता मान तो मान, या शब्दात त्यांनी अजित पवारांना टोला लगावला. सुप्रिया सुळे यांनी कधीच पवार नावाचा वापर केला नाही हेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. त्यासोबतच त्या म्हणाल्यात की, त्यांना निवडून द्यायचं की नाही हा तुमचा सर्वस्वी अधिकार असून तुम्ही जाणते आहात. तर आज काय घडतंय हे प्रत्येकाला ठाऊक आहे. आज आपण मुखामध्ये श्रीराम म्हणतो. पण, घराघरात काय चालू आहे, हे सर्वांना माहियेत. रामायण चालू आहे की महाभारत सुरू आहे, हेही तुम्हाला माहिती आहे, या शब्दात त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.