भारत अन् अफगाणिस्तानची ही डील, पाकिस्तानची झोप उडाली…

Spread the love

चाबहार बंदरात गुंतवणूक करुन अफगाणिस्तान सरकारने पाकिस्तान ऐवजी भारताला आपला मित्र म्हणून निवड केली आहे. यामुळे पाकिस्तानसमोर संकट उभे राहिले आहे. टीटीपी अतिरेकी पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करत आहेत. परंतु अफगाणिस्तान त्या अतिरेक्यांवर कारवाई करत नाही.

भारत अन् अफगाणिस्तानची ही डील, पाकिस्तानची झोप उडाली..

भारताची विदेशनीती चांगलीच यशस्वी होऊ लागली आहे. पश्चिम आशिया आणि मध्य पूर्व देशांमध्ये भारताची जादू दिसू लागली आहे. भारत आणि अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच चर्चा झाली. या चर्चेत तालिबान सरकार इराणमधील चाबहार पोर्टमध्ये 3.5 कोटी रुपये गुंतवणूक करण्यावर सहमती झाली आहे. तसेच तालिबान सरकारला आपला व्यापार आता चाबहार पोर्टमधून करायचा आहे. आतापर्यंत पाकिस्तानी बंदरामधून अफगाणिस्तानचा व्यापार होत होता. यामुळे आता पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारताच्या या खेळीमुळे पाकिस्तान एक्सपर्ट टेन्शनमध्ये आले आहेत. भारताच्या कुटनीतीचा हा मोठा विजय असल्याचे पाकिस्तानी तज्ज्ञ म्हणत आहेत.

पाकिस्तानचे नुकसान होणार..

पाकिस्तानचे संरक्षण आणि अफगाणिस्तानमधील एक्सपर्ट कमर चीमा म्हणतात, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या धोरणांची ही कमाल आहे. यामुळे तालिबान सरकारचे पाकिस्तानवर असणारे अवलंबत्व कमी होणार आहे. यामुळे अफगाणिस्तानकडून चाबहारमध्ये गुंतवणूक करण्यात येत आहे. इराण आणि भारत अफगाणिस्तान खूप काही देत आहेत. इस्लामाबाद आणि तालिबानमध्ये सुरु असलेल्या तणावामुळे पाकिस्तानला नुकसान पोहचणार आहे. तसेच तालिबान सरकारवर टीटीपी अतिरेक्यासंदर्भात पाकिस्तान दबाब निर्माण करु शकणार नाही.

अफगाणिस्तान करणार नाही अतिरेक्यांवर कारवाई…

चाबहार बंदरात गुंतवणूक करुन अफगाणिस्तान सरकारने पाकिस्तान ऐवजी भारताला आपला मित्र म्हणून निवड केली आहे. यामुळे पाकिस्तानसमोर संकट उभे राहिले आहे. टीटीपी अतिरेकी पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करत आहेत. परंतु अफगाणिस्तान त्या अतिरेक्यांवर कारवाई करत नाही. आता पाकिस्तानवरील अवलंबत्व तालिबान कमी करत असल्यामुळे यापुढे ते ऐकणार नाही. तसेच पाकिस्तान समोरचे एक, एक पर्याय बंद होत आहे.

चीनसुद्धा पाकिस्तानमध्ये करत असलेल्या गुंतवणुकीमुळे अडचणीत आणला आहे. तालिबान पाकिस्तानपासून लांब जात असल्यामुळे पाकिस्तानसमोर आणखी संकट येणार आहे. आधीच अडचणीत असलेल्या पाकिस्तानसमोर आणखी अडचण येणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page