सॅमसंगच्या धमाकेदार होळी सेलची घोषणा; ‘या’ प्रोडक्ट्सवर मिळेल भरघोस सूट…

Spread the love

होळीच्या निमित्तानं सॅमसंगनं आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. ज्यामुळं फक्त स्मार्टफोन नव्हे तर लॅपटॉप आणि टीव्हीसह इतर अनेक होम अप्लायंस डिस्काउंटसह विकत घेता येतील. कंपनीनं आकर्षक ऑफर्ससह आपल्या होळी सेलची घोषणा केली असून ग्राहकांसाठी यामध्ये आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली : सॅमसंग (Samsung) या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डनं त्‍यांचा विशेष होळी सेल लाँच केला आहे, ज्‍याअंतर्गत गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍स, लॅपटॉप्‍स, टॅब्‍लेट्स, अ‍ॅक्‍सेसरीज, सॅमसंग टीव्‍ही आणि इतर डिजिटल अप्‍लायन्‍सेस अशा विविध सॅमसंग उत्‍पादनांवर बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक्‍स मिळतील. या ऑफर्स Samsung.com, सॅमसंग शॉप अ‍ॅप आणि सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असतील.

कधी सुरू होईल सेल?…

15 ते 26 मार्चपर्यंत या कालावधीत हा सेल सुरू असेल. या होळी सेलदरम्‍यान गॅलेक्‍सी एस सिरीज, गॅलेक्‍सी ए सिरीजचे निवडक मॉडेल्‍स आणि गॅलेक्‍सी झेड सिरीजचे फ्लॅगशिप मॉडेल्‍स जवळपास 60 टक्‍क्‍यांच्‍या सूटसह उपलब्‍ध असतील. ग्राहक गॅलेक्‍सी बुक 4 (360), गॅलेक्‍सी बुक 4 प्रो, गॅलेक्‍सी बुक 4 प्रो 360, गॅलेक्‍सी बुक गो, गॅलेक्‍सी बुक 3 अल्‍ट्रा आणि गॅलेक्‍सी बुक 3, अशा गॅलेक्‍सी लॅपटॉप्‍सच्‍या खरेदीवर जवळपास 45 टक्‍के सूटचा लाभ घेऊ शकतात. तसंच गॅलेक्‍सी टॅब्‍लेट्स, वेअरेबल्‍स आणि अ‍ॅक्‍सेसरीजचे निवडक मॉडेल्‍स खरेदी करणारे ग्राहक जवळपास 55 टक्‍के पर्यंत सूट मिळवू शकतात.

1415 रूपयांचे मोफत इन्‍स्टॉलेशन…

सेलदरम्‍यान रेफ्रिजरेटर्स सारखे सॅमसंग डिजिटल अप्‍लायन्‍सेस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना निवडक मॉडेल्‍सवर जवळपास 49 टक्‍के सूट मिळेल. तर सॅमसंग विंडफ्री TM एसीचे निवडक मॉडेल्‍स जवळपास 39 टक्‍क्‍यांच्‍या सूटसह उपलब्‍ध असतील. तसंच दोन किंवा अधिक एसींच्‍या खरेदीवर अतिरिक्‍त 5 टक्‍के सूट मिळेल. फेस्टिव्‍ह सेल ऑफर अंतर्गत ग्राहकांना 1415 रूपयांचे मोफत इन्‍स्टॉलेशन देखील मिळेल. फुल ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्‍सच्‍या इकोबबल TM श्रेणीचे निवडक मॉडेल्‍स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जवळपास 50 टक्‍के सूटसह एक्‍स्‍चेंज फायदेही मिळतील.

मायक्रोवेव्‍हच्या खरेदीवर 45 टक्के सूट…

28 लीटर स्लिमफ्राय मायक्रोवेव्‍ह आणि 32 लीटर वाय-फाय एनेबल बीस्‍पोक मायक्रोवेव्‍ह अशा मायक्रोवेव्‍ह्जच्‍या खरेदीवर ग्राहक जवळपास 45 टक्‍के सूटचा लाभ घेऊ शकतात. स्‍मार्ट मॉनिटर्स आणि गेमिंग मॉनिटर्सच्‍या खरेदीवर ग्राहक जवळपास 59 टक्‍के सूट, जवळपास 20 टक्‍के बँक कॅशबॅक आणि जवळपास 3000 रूपयांची कार्ट सूट मिळवू शकतात.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page