कोकण समृध्द करणे हाच घ्यास असल्याचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यान्नी स्पष्ट केले …
ऱाजापूर/प्रतिनिधी – रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रचार सभेला मोठा प्रतिसाद लाभला. उपस्थीत महायुतीच्या नेत्यान्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे यांच्या कार्याचा गौरव केला . भारताच्या विकासासाठी ही निवडणुक महत्वाची असुन या चारसो पारच्या संख्येत रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदारही असेल त्यासाठी राणेना मोठ्या मताधिक्याने निवडुन आणु अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यानी बोलताना दिली . सदैव कोकणसाठी झटणारे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या सारखा नेता लोकसभेत असला पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या .
येथील राजीव गांधी स्टेडीअमवर पार पडलेल्या महायुतीच्या जाहीर प्रचार सभेला व्यासपिठावर राज्याचे उपमुख्यमंत्री ना . देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. ऱविंद्र चव्हाण ,रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत ,शिक्षणमंत्री दिपक केसरकर ,माजी खासदार निलेश राणेकणकवलीचे आमदार नितेश राणे , माजी विधान परीषदेचे विपक्षनेते प्रविण दरेकर ,सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राजन तेलीशिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडीत , शिवसेना नेते किरण सामंत राष्ट्रवादीचे लोकसभा समन्वयक अजित यशवंतराव ,माजी जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन ,माजी आमदार बाळ माने ,भाजपचे लोकसभा प्रभारी प्रमोद जठार ,जिल्हाध्यक्ष राजेश सावंत ,जेष्ठनेते राजन देसाई,भाजपचे जेष्ठनेते मधु चव्हाण ,राजापूर विधानसभा भाजप प्रभारी उल्का विश्वासराव ,महाराष्ट्र वारकरी संघाचे अध्यक्ष आणि संप्रदायाचे कोकरे महाराज ,यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थीत होते .
शिवसेना शिंदे गटाचे नेते,राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यान्नी आपल्या तडाखेबंद भाषणात महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली भारताच्या दृष्टीने ही निवडणुक जशी महत्वाची आहे तशीच ती कोकणसाठी देखील महत्वाची निवडणुक आहे . केंद्रात चारसो पार होणार हे नक्की आहे . नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळी देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार हे देखील सत्य आहे .मात्र त्या चारशे पार खासदार संखेत आमचे खासदार देखील असले पाहिजेत त्यासाठी राणे साहेबान्ना निवडुन द्यायचे आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणुन राणेसाहेबान्ना मोठ्या मताधिक्याने निवडुन देवु असा निर्धार ना . सामंत यानी व्यक्त केला महायुतीच्या काळात विकास कामे मार्गी लागल्याचे त्यान्नी ठणकावुन सांगितले या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील दोन मित्रपक्षान्नी आपले दोन जाहीरनामे प्रसिध्द केले आहेत त्यात तरुणान्ना रोजगाराची अश्वासने देण्यात आली आहेत .असे सांगायला काही पैसे पडत नाहीत .कारण विरोधकान्ना माहित आहे की सात जुन नंतर नरेंद्र मोदींचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे अशा शब्दात त्यान्नी विरोधकांची खिल्ली उडविली .महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंत्सर आणि उद्योगखाते आपल्याकडे आल्यानंतर राज्यातील उद्योग परराज्यात गेल्याची टिका सातत्याने केली गेली . मात्र जे उद्योग परराज्यात गेले हे उबाठा गटाचे अपयश आहे अशा शब्दात ना . सामंत यान्नी पलटवार केला .. ही लढाई नरेंद्र मोदी विरुध्द कमकुवत झालेल्या विरोधकांची आहे भारताला विकासाकडे घेवुन जाणारे ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील असे त्यान्नी पुढे बोलताना सांगितले देशात आणि राज्यात डबल इंजनचे सरकार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार चांगले काम करीत असल्याचे सांगुन ना . सामंत यान्नी या लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यान्ना शुभेच्छा दिल्या.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना रविंद्र चव्हाण यान्नी कोकणातुन होत असलेल्या स्थलांतराचा मुद्दा उपस्थीत करुन जर स्थलांतर थांबवायचे असेल तर नरेंद्र मोदीन्ना पुन्हा निवडुन द्यायचे आहे असे आवाहन केले. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यान्नी उपस्थीतान्ना संबोधीत करताना ही लोकसभा निवडणुक भारतासह महाराष्ट्र आणि कोकणासाठी अत्यंत महत्वाची असल्याचे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याचा जोरदार गौरव केला .
कोकण समृध्द करणे हाच घ्यास असल्याचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यान्नी स्पष्ट केले …
पुन्हा संसदेत चारशे पार घोषणा हे निवडुन येणार आहेतच त्यामध्ये आपल्या कोकणातील जागेचा देखील सामावेश असला पाहिजे असे सांगुन उपस्थीतान्ना साद घातली . पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विकसीत भारत हे मोठे स्वप्न असुन त्यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली आता ती तिसऱ्या स्थानावर आणायची आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी काम करीत आहेत भारताच्या विकासासाठी पंतप्रधान मोदीन्नी मोदीनी ५४ योजना कोरोना काळात दिल्या .तर . ८० कोटी जनतेला मोफत धान्य योजना दिली त्याचा लाभ असंख्य कुटुंबियान्ना झाल्याचे नारायण राणे यान्नी नमुद केले केंद्र शासनाने अनेक विकास कामे मार्गी लावली देशातील जनतेला ११कोटी ७२लाखस्वच्छतागृहे दिली .
मतदारसंघात उद्योजक आणणे येथील दरडोई उत्पन्न वाढविणे हा पहिला प्रयत्न राहिल .कोकण समृध्द करणे हाच घ्यास असल्याचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यान्नी स्पष्ट केले . आयुष्यमान भारत योजना आणली .. विविध योजना आणल्या .. गरीबी नष्ट व्हावी म्हणुन मोदी प्रयत्न करीत आहेत. उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्न केले कोकणातील मोठी समस्या बेकारी असुन त्यान्नी उपस्थीतांचे लक्ष वेधले . कोकणात उद्योगधंदे यावेत प्रयत्न व्हावेत अशी भुमिका त्यान्नी मांडली आपल्याला लोकसभेत जाण्याची संधी मिळाली की या मतदारसंघात उद्योजक आणणे येथील असल्याचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यान्नी स्पष्ट केले .
मागील पंचवीस वर्षात शिवसेनेने या मतदारसंघात काहीच विकास कामे न करता या मतदारसंघाला खूप मागे नेले .अशी टिका जेष्ठ नेते राजन देसाई यान्नी केली .यावेळी भाजपचे जेष्ठ नेते माजी प्रवक्ते मधू चव्हाण यासह राष्ट्रवादीचे या लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक अजित यशवंतराव यान्नी उपस्थीतान्ना संबोधीत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार असुन त्यांच्या जोडीला या लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणुन महायुतीचे उमेदवार नारायण राणे निश्चीत निवडुन जातील असा जोरदार विश्वास व्यक्त केला . ऱाजापूरातील राजीव गांधी स्टेडीअमवर आयोजीत महायुतीच्या जाहीर प्रचार सभेला मोठ्याप्रमाणावर जनसमुदाय उपस्थीत होता .