शक्ती प्रदर्शन करत पनवेल विधानसभेमधून प्रशांत ठाकूर यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत..

Spread the love

विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत; प्रशांत ठाकूर यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल…
राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याचपार्श्वभूमीवर पनवेल विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत; प्रशांत ठाकूर यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल…

*रायगड :* राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळत आहे. नुकतंच पनवेल विधानसभा मतदार संघातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. विजयाची हॅट्रिक करून आता विजयी चौकार मारण्यासाठी सज्ज असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुती निवडणुकीच्या रणसंग्रामात तयारीनिशी उतरली आहे.

प्रशांत ठाकूर यांच्या रॅलीला प्रचंड गर्दी…

प्रशांत ठाकूर यांनी आज (सोमवार, दि. २८) उमेदवारी दाखल केला आहे. यावेळी महायुतीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा सहभाग होता. हजारॊ कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत आपला जल्लोष ढोलताशाच्या गजरात प्रशांत ठाकूर यांना पाठींबा दर्शवला आहे. पनवेलच्या विकासाला गती आणि दिशा देण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. सामान्य कार्यकर्ता ते आमदार पण कोणताही बडेजाव नाही. साधी राहणी, लोकांच्यात सातत्याने वावरणारे आणि पनवेलच्या विकासाचा महामेरू असे व्यक्तिमत्व म्हणून आमदार प्रशांत ठाकूर परिचित आहेत. त्यांचा अर्ज दाखल करताना युवा, महिला, ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालय येथून निघालेली रॅली शहरातून प्रांत अधिकारी कार्यालय येथे पोहोचली. तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर लोकनेते दि. बा. पाटील यांच्या संग्राम निवासस्थानी जाऊन दिबासाहेबांना अभिवादन केले.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघात केलेल्या कामांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला आहे. लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा आणि दांडगा जनसंपर्क असलेले सर्वसामाजाचे प्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. सर्वांगिण आणि शाश्वत विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने मोठे योगदान देत आहेत. त्यामुळे त्यांना सर्व समाजात मानणारा वर्ग मोठा आहे. यावेळीही मोठा विजय असावा अशी संपूर्ण मतदार संघातील जनतेची इच्छा आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते आणि सर्व समाजातील नागरिक सज्ज झाल्याचे स्पष्ट चित्र आज अर्ज दाखल करताना दिसत होते.

आपली लढाई फक्त मताधिक्य रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी आहे- आमदार विक्रांत पाटील..

याचपार्श्वभूमीवर आमदार विक्रांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाटील म्हणाले की, “प्रशांत ठाकूर यांच्या विधायक कार्यप्रणालीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.आता विरोधक काय करू आणि काय ठेऊ करत बसले आहेत. आपल्या लढाईला विरोधक नाही आपली लढाई फक्त मताधिक्य रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी आहे”. पुढे पाटील असंही म्हणाले की, पनवेलमध्ये लाडक्या बहिणींना ताकद देण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. त्यामुळे माता भगिनी देखील प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत. निवडणुकीत विरोधकांना बोलण्यासारखे काही नाही म्हणून ते खोटा प्रचार करतील आपण सर्वानी याबाबतीत सावध राहिले पाहिजे.व अशा परखड शब्दात आमदार विक्रांत पाटील यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page