*ल्हासा-* तिबेटमध्ये शक्तिशाली भूकंप झाला असून या शक्तीशाली भुकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. सुमारे ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे तिबेटमध्ये आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८ जण जखमी झाले आहेत. या भूकंपाचं केंद्र २८.५ डिग्री उत्तर अक्षांश आणि ८७.४५ डिग्री पूर्व येथे होता. या भूकंपाचं केंद्र १० किमी खोलीवर होतं. दरम्यान, या भूकंपाचे धक्के नेपाळ, भारत आणि बांगलादेशपर्यंत जाणवले.
आतापर्यंत या भूकंपात ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र काही वृत्तसंस्थांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. भूकंपामुळे तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी लोक घरांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारती कोसळल्याचे व्हिडीओत दिसत आहे. सकाळी ६.३५ वाजता ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झाली. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, नेपाळपासून सुमारे 93 किमी ईशान्येस तिबेटमधील लोबुचे हे भूकंपाचा केंद्र असल्याचे समोर आले.
भूकंपामुळे तिबेटमध्ये मालमत्तेची मोठओी हानी झाली आहे, इमारती कोसळल्या आहेत. आतापर्यंत या भूकंपामध्ये ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक इमारतींसह पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भूकंपाचे धक्के भारतमधील बिहार, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही जाणवले. त्याशिवाय नेपाळ, बांगलादेश आणि भूतानच्या अनेक भागातही भूकंपाचे हादरे जाणवले. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले आणि रस्त्यावर मोकळ्या जागेवर गेले. नागरिक झोपेत असताना अचानकच भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे भीतीचे वातावरण होते. भूकंपाची तीव्रता प्रचंड मोठी होती. तिबेटसह नेपाळ, बांग्लादेश, भारत आणि चीनमध्येही याचे परिणाम जावले. 10 किलोमीटर खोलीवर केंद्रीत झालेल्या या भूकंपामुळे बिहार आणि उत्तर भारतातील अनेक भागत जबर हादरे बसले. लोबुचे हे नेपाळमधील खुंबू ग्लेशियरजवळ काठमांडूच्या पूर्वेस एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या जवळ आहे.