रत्नागिरी- भापजचे नेते नारायण राणे यांची ज्येष्ठ सुपुत्र निलेश राणे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. निलेश राणे यांनी स्वत: तशी इच्छा बोलून दाखवली आहे. यामुळे आता कुडाळ मतदारसंघात कट्टर वैरी आमने-सामने पाहायला मिळू शकतात.
निलेश राणे रत्नागिरीतील निवळी येथे आले असता पत्रकारांनी विधानसभा निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतात आपण विधानसभा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. निलेश राणे म्हणाले की, मी विधानसभा निवडणुकीत दिसणार असून शंभर टक्के निवडणूक लढवणार आहे. आणि जिंकणार पण आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मतदारसंघ कोणता असेल याबाबत मात्र वरिष्ठ ठरवतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
2014 मध्ये निलेश यांना स्वीकारावा लागला पराभव…
निलेश राणे यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 2024 च्या लोकसभेत कुडाळ-मालवणमधून नारायण राणेना चांगले मताधिक्य मिळाले होते. यामागे निलेश राणे यांची मेहनत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे कुडाळमधून निलेश राणे हे विधानसभेसाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
2024 लोकसभेत महायुतीला मिळाले मताधिक्य…
निलेश राणे कुडाळ-मालवण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यासाठी ते मतदारसंघात दौरे करत असून नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीला मोठे मताधिक्य मिळाले होते. सध्या या मतदारसंघातून ठाकरे गटाचे वैभव नाईक हे आमदार आहेत. नाईक यांनी 2014 मध्ये नारायण राणे यांचा पराभव केला होता.
राजकोट किल्ल्यावर झालेल्या दुर्घटनेनंतर निलेश राणे आणि वैभव नाईक यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. मात्र सध्या या ठिकाणी महायुतीचा म्हणजेच ठाकरे गटाचा आमदार आहे. त्यामुळे जर का निलेश राणे यांना उमेदवारी देण्याचे ठरले तर, हा मतदारसंघ भाजपला दिला जाणार का? हे पहावे लागणार आहे.