आर्थिक विवंचनेतून नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची राहात्या घरी आत्महत्या.

Spread the love

नेरळ : सुमित क्षीरसागर

नेरळ : – नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने नेरळ सम्राटनगर येथील राहात्या घरात आर्थिक विवंचनेतून गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या मयत कर्मचाऱ्याचे नांव गणेश उर्फ टेंग्या जैतु जाधव असे आहे. तर नऊ महिने ग्रामपंचायत कडून पगार मिळाला नसल्यामुळे बँकेचे हप्ते थकल्याने व आलेल्या नोटिसा त्यातच घरात कमवता कोण नसल्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची स्थानिकान मध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. तर मयत गणेश हा आत्महत्या करण्यापूर्वी सकाळी आपल्या मित्रांना देखील भेटला असल्याचे बोलले जात आहे. नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील सम्राट नगर बौद्धवाडा येथे राहणार व नेरळ ग्रामपंचायती कर्मचारी गणेश उर्फ टेंग्या जैतु जाधव यानी आज १० फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला लटकत आपले जीवन संपविले आहे. तर स्थानिक नागरिकांनी गणेश याला आवाज दिला असता तो घराचा दरवाजा उघडत नसल्याने खिडकीतून वाकून पाहिले असता गणेश हा घराच्या पत्र्याच्या शेडला असलेल्या लोखंडी पाईपाला लाल ओडणीच्या साहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.यावेळी येथील नागरिकांनी सदर घटनेची माहिती ही नेरळ पोलीस ठाण्यात देताच घटनास्थळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे दाखल झाले होते. तर मयत गणेश च्या आत्महत्या मागे त्याची आर्थिक चणचण असल्याचे स्थानिकान मधून दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. तर मयत गणेश हा गेली दहा वर्षाहून अधिक काळ नेरळ ग्रामपंचायत मध्ये सफाई कामगार म्हणून कायमस्वरूपी पर्मनंट काम करीत होता. परंतु गेली नऊ महिने नेरळ ग्रामपंचायतीकडून सफाई कर्मचाऱ्यांना पगार हे दिले गेलेले नाहीत यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी बँके कडून घेतलेले लोणचे हप्ते न भरल्याने बँकेकडून कर्मचाऱ्यांना नोटिसा आल्या असल्याची माहिती समोर येत आहे. त्यात मयत गणेश याला देखील नोटीस आल्याचे व पगारा शिवाय इतर कोणता आर्थिक स्त्रोत नसल्याने मयत गणेशला दोन लहान मुलांचे शिक्षण,घरातील घरखर्च चालवणे कठीण जात होते.तर शुल्लक कारणावरून आर्थिक विवंचनेतून पत्नी सोबत चिडचिड झाल्याने अखेर गणेशने शुक्रवार रात्री नाईट ड्युटी करून घरी आल्यावर सकाळी उठून काही मित्रांना भेटला होता नेहमी प्रमाणे हसत खेळत तो आपल्या कामातील मित्रां भेटला असल्याचे ही चर्चा सुरू आहे. तर नेरळ पोलीस ठाण्यात अ. मृ. क्र. ०४ /२०२४

सी.आर. पी.सी १७४ प्रमाणे अ. मृ. क्र नोंद क्र. २९ पती पत्नीच्या भांडणाचा राग मनात धरून दारूचे नशेत स्वःताला राहात्या घराच्या छताच्या लोखंडी पाईपाला लाल रंगाच्या ओडणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. तर स्थानिकान मधील दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेनुसार नेरळ ग्रामपंचायततीच्या नियोजन शुन्य कारभाराचा एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमावून किंमत मोजावी लागली आहे का? असा प्रश्न मात्र उपस्थित होत असुन, आज ही असे ४० हून अधिक सफाई कर्मचारी यांना नऊ महिने पगार मिळलेला नसल्याचे कर्मचारी वर्गाकडून बोलले जात असल्याने, गणेश च्या आत्महत्याच्या घटनेची दखल घेत नेरळ ग्रामपंचायत इतर सफाई कर्मचारी यांच्या थकीत पगाराची व्यवस्था करणार का? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page