नेरळला संसार उध्वस्त करणारे मटका ग्रहण !रायगड जिल्ह्यात नेरळ पोलीस स्टेशन हद्दीत राजरोसपणे मटका चालू. सोशल नेटवर्किंगचा हायटेक मटक्याचा धंदा चालवणाऱ्याची संख्या आधिक……

Spread the love

नेरळ : सुमित क्षीरसागर

नेरळ येथे राजरोसपणे अवैध मटका सुरु असून याकडे स्थानिक पोलीस यांचे दुर्लक्ष होत आहे.

काही मोठ्या पक्षाचे पदाधिकारी पोलिसांच्या आशीर्वादाने मोबाईलचे हायटेक मटक्याचे व्यवसाय चालवतात आसे दबक्या आवाजात बोले जात आहे. मात्र संसार उध्वस्त करणारे मटक्याचे नेरळ शहराला लागलेले ग्रहण सुटणार कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेरळ शहराचा विकास झपाट्याने होत असून या शहरात मात्र अवैध धंद्याना ऊत आला आहे. पैशाच्या अमिषाला भुलून अनेक गरीब कुटुंब उद्धवस्त होत असून नेरळ पोलिस जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था यांनी केले आहे.

रायगड जिल्हात अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवलेला आहे. ही लढाई गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. नेरळ येथे सुरू असलेल्या अवैध मटका जुगार धंदा राजरोसपणे सुरू आहे. अशा अवैध धंद्याविरोधात पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे. कोरोना काळात अनेक कुटुंब उद्धवस्त झाली असून काही लोकांच्या नोकऱ्या सुद्धा गेल्या आहेत. त्यामुळे गावाकडे रोजंदारीवर काम करून अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. परंतु पैशाच्या लोभामुळे बरेच लोक कमीवेळात जास्त पैसा मिळत असल्यामुळे या अवैध धंद्याकडे वळले असून कल्याण, मेन यावर आकडे, पाना लावून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सध्याकाळी मिळणारी मजूरी अधिक पैसे मिळतील. या आशेने मटका खेळून रिजल्टची वाट पाहत असतात. हे मटका खेळणारे हे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील लोक दिवस भर मोलमजुरी करून संध्याकाळी मिळणारी मजूरी अधिक पैसे मिळतील. या आशेने मटका खेळतात. तर पूर्वीच्या चिठ्यांची जागा आता हायटेक तंत्रज्ञानाने घेतली आहे. मोबाईलवर राजरोस मटका खेळाला जातो हि मोठी शोकांतिका आहे.
पैशाची बरबादी करून कुटुंब उध्दवस्त करीत आहेत. मटका “खेळणा-या काही जणांना कमिवेळात पैसा मिळत असल्यामुळे हा पैसा व्यसनाधिनतेकडे जात आहे त्यामुळे अनेक कुटूंब उध्दवस्त झाली आहेत. यामध्ये मटका चालक दिवसेन दिवस गब्बर होत असून मोलमजूरी करणारे मात्र देशोधडीला लागले असून त्याचे कुटुंब रस्त्यावर आले आहेत. नेरळ पोलिसांनी अवैध मटका धंद्यावर त्वरित कारवाई करून सर्वसामान्य गरीब जनतेचे कुटुंब वाचवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था. तसेच रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध मटका जुगार धंदे लवकरात लवकर बंद करावे ही मागणी आता जोर धरत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page