आयपीएल 2024 चा 64 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळण्यात आला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीनं 19 धावांनी सामना जिकंत लखनौला पराभूत केलं.
नवी दिल्ली : आयपीएल 2024 चा 64 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर खेळण्यात आला. लखनौ सुपर जायंट्स संघासाठी हा सामना जिंकणं अत्यंत महत्त्वाचं होतं. मात्र या सामन्यात दिल्लीनं चमकदार कामगिरी करत हा सामना 19 धावांनी जिंकला. या विजयाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तसंच राजस्थान रॉयल्सला चांगलाच फायदा झाला आहे.
🔹️दिल्लीचा प्लेऑफमध्ये प्रवेश…
अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्सचं अर्धशतक आणि शाई होप, ऋषभ पंतच्या फलंदाजीच्या जोरावर दिल्लीनं 208 धावा केल्या. या विजयासह दिल्ली प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. दुसरीकडं राजस्थान रॉयल्स आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ बनला आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सनं 20 षटकांत 4 गडी गमावून 208 धावा केल्या. टिस्ट्रन स्टब्सनं 25 चेंडूत नाबाद 57 धावा केल्या. अक्षर पटेलनं 10 चेंडूत नाबाद 14 धावा केल्या. अभिषेक पोरेलनं 33 चेंडूत 58 धावा केल्या. ऋषभ पंतनं 23 चेंडूत 33 धावा केल्या. लखनौकडून नवीन उल हकनं 51 धावांत 2 बळी घेतले. अर्शद खाननं 45 तसंच रवी बिश्नोईनं 26 धावांत 1 बळी घेतला.
🔹️ईशांतच्या गोलंदाजीमुळं लखनौचा संघ घायाळ…
209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौनं 9 बाद 189 धावा केल्या. लखनौच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. केएल राहुल (5), मार्कस स्टॉइनिस (5), क्विंटन डी कॉक (12), दीपक हुडा (0) हे लखनौचे अव्वल 4 फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर निकोलस पूरननं 27 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह 61 धावा करत संघाचा डाव एकहाती सावरला. त्यानंतर आयुष बडोनी 6 धावा करून बाद झाला. त्यानंतर कृणाल पांड्या 18 धावांवर पव्हेलियनमध्ये परतला. यानंतर लखनौचा अष्टपैलू खेळाडू अर्शद खाननं 33 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह 58 धावा करत लखनौला आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यानं पहिल्याच षटकात जेक फ्रेझर मॅकगर्कचा झेल घेतला. दिल्लीकडून सामनावीर ठरलेल्या इशांत शर्मानं सर्वाधिक 3 बळी घेतले. तर खलील अहमद, अक्षर पटेल, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
🔹️लखनौ प्ले-ऑफमध्ये पोहजचण अशक्य…
दिल्लीच्या विजयामुळं लखनौला आता प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळजवळ अशक्य झालं आहे. त्याचवेळी दिल्लीच्या सर्व आशा संपल्या आहेत. या मोसमातील शेवटचा साखळी सामना खेळण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स मैदानात उतरली होती. अशा प्रकारे, संघाला हंगामातील 14 सामन्यांत 7 विजय आणि 7 पराभवांसह केवळ 14 गुण मिळवता आले. दिल्ली अधिकृतपणे प्लेऑफमधून बाहेर पडलेला नाही. मात्र, त्यांच्या खराब रनरेटमुळं त्यांना प्लेऑफमध्ये जाणे कठीण होतंय.
🔹️लखनौ तालिकेत 7 व्या क्रमांकावर-
13 सामन्यांत 6 विजयांसह दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्स 12 सामन्यांत 6 विजयांसह 7व्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांमधील विक्रमांबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही संघानी आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. या कालावधीत लखनौ 3 वेळा विजय मिळवला आहे. त्याचवेळी दिल्ली संघाला केवळ एकदाच विजय मिळवण्यात यश आलं आहे.
🔹️लखनौ प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कर्णधार-विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पुराण, कृणाल पंड्या, अर्शद खान, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, नवीन उल हक, मोहसीन खान.
🔹️दिल्ली प्लेइंग इलेव्हन : ऋषभ पंत (कर्णधार-विकेटकीपर), जॅक फ्रेझर मॅकगर्क, अभिषेक पोरल, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, गुलबदिन नायब, रसिक सलाम, कुलदीप यादव, मुकेश कुमार, खलील अहमद.