महायुतीच्या उमेदवारांकरिता पंतप्रधान मोदी आज नाशिकसह कल्याणमध्ये घेणार सभा, मुंबईत करणार रोड शो…

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज राज्यात प्रचार करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणेनं सुरक्षेसाठी बंदोबस्त ठेवला आहे.

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी दिंडोरी येथे दुपारी 3.15 वाजता जाहीर सभेत संबोधित करणार आहेत. तर कल्याण येथे संध्याकाळी 5:15 वाजता जाहीर सभा घेणार आहेत. संध्याकाळी 6.45 वाजता मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघात रोड शो करणार आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे हे लोकसभा निवडणूक लढवित आहेत. नाशिकमधील दिंडोरी येथून डॉ. भारती पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा निवडणूक लढवित आहेत. या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येणार आहेत.

🔹️पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती?…

मोदींनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक उमेदवार म्हणून मंगळवारी उमेदवारी अर्ज भरताना शपथपत्र सादर केले. या शपथपत्रात त्यांनी संपत्तीसह शिक्षणाची माहिती दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसीमधून लोकसभा उमेदवारीचा अर्ज भरला. त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडं 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे, त्यातील बहुतांश संपत्ती बँकेतील मुदत ठेवींमध्ये आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर प्रदर्शित केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण जंगम मालमत्ता 3,02,06,889 रुपये इतकी आहे. 2.85 कोटींहून अधिक रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मुदत ठेवींच्या स्वरूपात आहे.

🔹️मोदींनी घेतले आहे एमएचे शिक्षण…

पंतप्रधान मोदींविरुद्ध कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नाही. त्यांना कोणत्याही गुन्ह्यासाठी आजतागायत दोषी ठरवण्यात आलेले नाही. त्यांनी 1967 मध्ये एसएससीचे शिक्षण पूर्ण केले. 1978 मध्ये दिल्ली विद्यापीठातून बीए आणि 1983 मध्ये गुजरात विद्यापीठातून एम. ए. शिक्षण घेतले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, मोदींनी गुजरातच्या गांधीनगरमधील निवासी भूखंडासह 2.5 कोटी रुपयांची मालमत्ता, 1.27 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आणि 38,750 रुपयांची रोख रक्कम जाहीर केली होती.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page