पोस्टाच्या पारंपरिक बचतीकडून शेअर बाजारात गेलीय भारतीयांची बचत’, अर्थमंत्र्यांकडून स्पष्टीकरण…

Spread the love

देशातील अंतर्गत बचत घटत असल्याचा आरोप सातत्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. ही बचत पारंपरिकदृष्ट्या घटली असेलही, मात्र तिचे रूपांतर झाले आहे. ही बचत आता पोस्टाच्या पारंपरिक बचतीकडून डिमॅट खात्यांकडे गेली आहे, असे निरीक्षण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी मांडले. मुंबई शेअर बाजाराच्या इमारतीत विकसित भारत ही संकल्पना स्पष्ट करताना त्या बोलत होत्या. वित्त बाजारांची अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे असेही त्यांनी सांगितले.

देशातील वित्त बाजार लवचिक असावा असे सांगताना त्यासाठी बाजाराने कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ट्रेंडिग केल्यापासून तिसऱ्या दिवशी (टी+३) व्यवहारपूर्ती होण्याच्या दिवसांकडून आता शेअर बाजाराने ट्रेंडिग केल्यापासून शून्य दिवसात किंवा त्याच दिवशी (टी+०) त्याची व्यवहारपूर्ती होण्याकडे वाटचाल केली आहे. ही घटना जगभरातील भांडवल बाजारांना चकित करून गेली आहे, या शब्दांत सीतारामन यांनी शेअर बाजारांची प्रशंसा केली.
या कार्यक्रमाला विकसित भारतसाठी विशेष संपर्क अभियान प्रमुख शायना एनसी, राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि भांडवल बाजारतज्ज्ञ, ब्रोकर आदी उपस्थित होते. मुंबई शेअर बाजाराचे एमडी व सीईओ सुंदररमण राममूर्ती यांनी बाजाराच्या एसएमई मंचावर मंगळवारी ५००वी कंपनी सूचिबद्ध झाल्याचे जाहीर केले.

भारतीय सर्वसामान्य नागरिकाची बचत आता बाजाराकडे जात आहे. हा रिटेल गुंतवणूकदार जोखीम उचल्याची तयारी दाखवत आहे. आजमितीला देशात सुमारे १५ कोटी डिमॅट खाती कार्यरत आहेत. तसेच डेट मार्केट गेल्या तीन वर्षांत तिप्पट वाढले आहे. मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल १० वर्षांपूर्वी जितके होते त्यापेक्षा आज ४० लाख कोटींवर पोहोतले आहे, याकडेही सीतारामन यांनी लक्ष वेधले.
काउंटर बॅलन्सिंग देशातील रिटेल व संस्थात्मक गुंतवणूकदार आता मोठ्या प्रमाणावर शेअर बाजारात गुंतवणूक करतो आहे.

त्याचवेळी विदेशी गुंतवणूकदार करत असलेली गुंतवणूक ही बेभरवशी ठरत आहे. कधी हे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर समभाग खरेदी करताना दिसतात तर कधी हे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर निधी काढून घेतानाही दिसतात. अशा वेळी सातत्याने देशी गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक केली जात आहे. हे गुंतवणूकदार विदेशी गुंतवणूकदारांचे लहरी वागणे थोपवत काउंटर बॅलन्सिंग करतात, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page