
नवरात्र उत्सवातील दुर्गादेवी स्त्री शक्तीच्या प्रेरणादायी, नेतृत्वान, कर्तृत्ववान, गुणांकडे झेप घेणाऱ्या महिला!
वडिलांच्या इच्छेमुळे चौथीपासूनच अभ्यास व शिक्षणात घेतले कष्ट!
स्त्री शक्तीच्या विविध रूपांना अभिवादन करून जिथे तिची पूजा होते, तिथे देवाचे अधिष्ठान असते. हे शिकवणारी आपली संस्कृती आहे. ज्या संस्कारात आपण वाढलो ती संस्कृती व ते संस्कार जपले गेले पाहिजेत. तसे वागण्याची बुद्धी तिने सर्वांना दिली पाहिजे.
नवरात्र हा देवीचा उत्सव! देवी म्हणजे साक्षात स्त्री शक्ती! नवदुर्गेची पूजा ही एका दृष्टीने स्त्रीची पूजा समजली जाते.
कारण देवी जशी स्त्री,माता,भगिनी, पत्नी,सखी,कन्या ,अशी सर्व नाती निभावून नेणाऱ्या स्त्रीचेच प्रतीक आहे. संकट हरण करणे,
कल्याणकारी असणे, तसेच सामान्य जीवनात स्त्रीचे कर्तव्य मानले जाते. केवळ घरी गृहिणी म्हणून स्त्री सर्व जबाबदारी निभावत असताना देवीच्या स्त्री रुपी प्रेरणेने आज स्त्रिया घर संसार व नोकरीने(job) सुद्धा अगदी कुशलतेने संभाळत असतात .हे स्पष्ट दिसत आहे. अशाच एक स्त्री भगिनी संगमेश्वर तालुक्याचे पालकत्व अगदी कर्तव्यदक्ष व जबाबदारीने पार पाडत आहेत त्या म्हणजे संगमेश्वर तालुक्याच्या विद्यमान तहसीलदार अमृता साबळे!

अमृता साबळे यांचा जन्म सातारा जिल्ह्यात झाला असून, बालपणीचे इयत्ता चौथी पर्यंत शिक्षण शिवथर या गावात झाले. त्याने गटविकास अधिकारी असलेले वडील विलास साबळे यांनी आपली मुलगी शिष्यवृत्तीला बसवून योग्य मार्गदर्शन व अभ्यास सराव करून चौथीची शिष्यवृत्ती व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर सातारा येथे बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून घेतले. वडिलांचा असलेला विश्वास व इच्छा अशी होती, की मुलगी अमृताने क्लास वन ऑफिसवर व्हावं. त्यामुळे शिष्यवृत्ती स्टायपेंड आठ हजार मधून खर्च चालवत पुढील शिक्षण चालू ठेवले.

त्यानंतर इंजिनिअरिंग साठी पुणे येथे प्रवेश घेऊन तेही शिक्षण पूर्ण केल्यावर , मुंबई येथे एमटेक शिक्षण पूर्ण करून एमबीएही पूर्ण केले. अशाप्रकारे शिक्षणाची वाटचाल सुरू असताना २०१७ मध्ये एमपीएससीचा चांगला अभ्यास करून खुल्या महिला प्रवर्गात महाराष्ट्र राज्यात प्रथम नंबर ने उत्तीर्ण झाल्या. व वडिलांचे असणारे स्वप्न पूर्ण होणार असा आत्मविश्वास वाढू लागला. इंजिनिअरिंग, एम टेक, एसबीए, असे शिक्षण झाल्यावर खाजगी नोकरी दिसत नव्हती. म्हणून गव्हर्मेंट नोकरीसाठीच्या पोस्ट दिसत होत्या. एमपीएससी २०१७ मध्ये उत्तीर्ण होऊन नोकरीसाठी डेप्युटी कलेक्टर म्हणून निवड झाली. परंतु काही तांत्रिक कारणामुळे तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली.



प्रथम तहसीलदार म्हणून अहमदनगर तालुक्यात नियुक्ती झाली. काही दिवस सेवा केल्यावर तिथून बदली रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली .व तेथेही काही दिवस सेवा झाल्यावर बदलीने संगमेश्वर तालुका तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली.
त्या सांगतात की ज्या ज्या ठिकाणी सेवा केली त्याहीपेक्षा माझी सेवा संगमेश्वर तालुक्यात समाधानी सेवा होत आहे. कारण समोर गोष्टी मोठ्या होण्याआधीच तालुक्यातील शांत संयमी लोक अगोदरच येऊन व भेटून माहिती देतात. तसेच राजकीय मंडळी असो किंवा सामाजिक क्षेत्रातली मंडळी असो. तांत्रिक गोष्टी समजावून घेऊन नेहमी सहकार्य करतात. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करताना आनंदी व छान वाटते.
तालुक्याचे तहसीलदार म्हणजे पालकत्व असलेले अपघात, प्रसंग, आपत्ती यासारख्या संकटांना एक जबाबदार तालुक्याचे पालक स्त्री म्हणून सामोरे जावे लागते. अशाच यावर्षीच्या वादळी पावसाच्या आपत्तीने या तालुक्यातील पोचरी गावातील प्राथमिक शाळेचे संपूर्ण छप्परच उडून गेले होतें. त्यावेळी तात्काळ भेटी देणे, चटकन निर्णय घेणे, व तेथील लोकांना समजावून धीर देणे, अशा गोष्टी एक स्त्री म्हणून साबळे नेतृत्वाने, धाडसाने व तितक्या जबाबदारीने पोचरी येथे स्वतः भेट देऊन दोन मंडळ अधिकारी व चार तलाठी अशी यंत्रणा घेऊन तेथील लोकांच्या मदतीला व पडझड झालेल्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्याचप्रमाणे पोचरी गावातील ग्रामस्थ सुद्धा ऍक्टिव्ह असलेले राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी या कामी योगदान खूप चांगले दिले. किंबहुना स्त्री सरपंचांनी आपल्याकडील काही पत्री वगैरे साहित्य देऊन सहकार्य केले. काम पूर्ण होईपर्यंत ऑफिसकडील यंत्रणा तेथे चालू ठेवून आवश्यक मार्गदर्शन करत होत्या.व लक्षही देत होत्या.
त्या आवर्जून सांगतात की तश तालुक्याचे पालकत्व माझ्याकडे असलेने मी बाहेर कुठे असेन, घरी असेन, किंवा स्वतः आजारी असेन तरीसुद्धा तालुक्यात घडणाऱ्या गोष्टीचा प्रत्येक वेळी लक्षपूर्वक आढावा घेऊन दखल घेत असते. त्यामुळे तालुक्याच्या पालकत्वाची जाण मनोमनी असते. जनसामान्यांची सेवा करून ज्यावेळी ७०/८० लोक एकत्र येऊन टाळ्या वाजवून लोक जेव्हा समाधानी होतात. हाच अधिकारी म्हणून आयुष्यातील आनंदाचा क्षण म्हणून त्या मानतात.
ऑफिसला येणारी अपंग व्यक्तीला मदत केली तर त्यांच्या डोळ्यातील समाधानाचे अश्रू दिसतात. वयोवृद्ध आजोबांना जर मुले सांभाळ करत नसतील तर त्यांच्या मुलांना समजावून सांगून किंवा समुपदेशन करून अशा वयोवृद्ध आजोबांचा प्रश्न मार्गी लावतात.
या जबाबदार स्त्री नेतृत्वामुळे आपण आपल्या कामात यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक स्त्रीने आपण स्वतः स्वावलंबी चाकोरीच्यि बाहेर येऊन स्वतः आपण स्त्री म्हणून कमी आहोत ही भावना मनातून काढून पुरुष वर्गाशिवाय किंवा कुटुंब प्रमुखाशिवाय आपण निर्भीडपणे व आत्मविश्वासाने यशस्वी होऊ शकतो .आपण नारीशक्ती हे केवळ नवरात्र पुरतेच न ठेवता वर्षभर धाडसाने कार्यरत राहावे. तसेच स्त्री म्हणून गरज भासली मार्गदर्शना साठी ऑफिसमध्ये भेटावे. म्हणजे आमच्यासारखी मंडळी आधार देऊ शकतात. शब्दाच्या आधाराने सुद्धा प्रसंगी व्यक्तीला मोठी उभारी मिळू शकते. माझ्यासारखे विविध क्षेत्रात ज्ञान मिळवून स्वतःच्या ताकतीने समाजात उभे राहावे असे महिलांना त्या सूचित करतात.
आतापर्यंत पाच वर्षे तहसीलदार पदावर सेवा केली असून सीनियरटी प्रमाणे प्रमोशन मिळेल, याहीपेक्षा चांगली सेवा करण्याचा मानस आहे असं त्या सांगतात. पण असेच राहायचे की असे नाही, या शिक्षणाचा उपयोग खाजगी नोकरी देशात, परदेशात जॉब ची संधी मिळाल्यास आपण त्यासाठी विचार खुले निर्णय मनात ठेवले आहेत. सेवा करत असताना सुद्धा कायद्याची तीन वर्षे शिक्षणाची पूर्ण केली आहेत. संगमेश्वर तालुक्यातील लोकांचे सहकार्यर व ऑफिसमधील मधील कर्मचारी वर्गामुळे स्त्री तहसिलदार म्हणून आनंदी असल्याचे सांगतात.
🟣लेख शब्दांकन – श्रीकृष्ण खातू / धामणी /संगमेश्वर -मोबा.नं.८४१२००८९०९

