
राज्यातील विविध महामार्ग – मार्गासह इतर रस्त्यांवर अपघातांचे सत्र सातत्याने सुरू असून जनजागृती – नंतरही अपघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक बनले आहे, मुंबई-गोवा -महामार्गावरील कशेडी टॅप हद्दीत २०२४ या चालू वर्षातील जानेवारी ते ऑगस्टमध्ये एकूण २६ अपघाताच्या घटना घडून झालेल्या अपघात १४ जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे समोर आले आहे.तर ८७७४ वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करत दंडात्मक कारवाई पोटी १कोटी ३३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महामार्गावर भरधाव वेगाने मार्गस्त होणारे वाहने अपघातात कारणीभूत ठरत असल्याचे चित्र दिसून येत असले तरी गतवर्षी पेक्षा मुंबई-गोवा महामार्ग वरील कशेडी पोलस टॅप हद्दीत अपघाताचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी मृत्यू चे प्रमाण चिंताजनक ठरणारे आहे. जानेवारी २४ ते ऑगस्ट २४ या कालावधीत विविध ठिकाणी झालेल्या २६ अपघात १४ जणांना तर ३० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
मुबंई -गोवा महामार्ग कोकणसाठी महत्त्वाचा आहे. महामार्गावरील वाहनांची तपासणी अपघात प्रसंगी तातडीची यंत्रणा राबविण्यासाठी पळस्पे फाटा ते तळ कोकणपर्यंत ७ ठिकाणी महामार्ग पोलीस यंत्रणा उभारण्यात आली आहे. यापैकी रायगड जिल्हा व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कशेडी पोलीस यंत्रणा उभी करण्यात आली असून या विभागाने आपल्या अधिपत्याखाली असलेल्या मार्गावर केलेल्या वाहनवरील कारवाई पोटी लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. या महामार्ग पोलिसानी २०१५ मध्ये सर्वाधिक वाहनचालकांवर कारवाई केली होती.
गेल्या वर्षभरात पोलीसदलात बदल झाले असून अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. त्याचप्रमाणे दंडाची रक्कम ऑनलाईन प्रणालीसह विविध नियमांचे उल्लंघन केल्यावर आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम मध्ये वाढ केल्याने महसुलमध्ये वाढ होत आहे. यामध्ये वेगाने वाहने मार्गस्त करणे वाहनांचे इन्शुरन्स संपले म्हणून कारवाई, मोठी वाहने परमिट नसल्याने कारवाई करण्यात आली आहे, सर्वात जास्त कारवाई ही ट्राफिकला अडथळे करणाऱ्या वाहन चालकांवर करण्यात आल्याचे समोर आले आहे.
कशेडी घाटामध्ये अपघाताचे सातत्य कायम राहिल्याने सदरचा मार्ग कायम चर्चेत राहिला आहे. या ठिकाणी पोलिसांच्या दिमाखात नवीन वाहन असेल तरी क्रेन ची कमतरता भासत आहे. अपघात घडल्यास महामार्ग विभागाकडे हक्काची क्रेन नसल्याने बाहेरील क्रेनवर आधारीत राहावे लागत आहे.
महामार्ग पोलिसांनी केलेली जनजागृतीसह सुरक्षा सप्ताहासारखे कार्यक्रम योग्य पद्धतीने करत असून गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी नियम तोडणाऱ्या गाड्यांची संख्या कमी झालेली आहे.

