भाजपा ठाणे शहर (जिल्हा) व नवयुग मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सव २०२३ चे आयोजन

Spread the love

ठाणे – सालाबादप्रमाणे ह्यावर्षीसुद्धा नवयुग मित्र मंडळातर्फे आपली परंपरा जपत नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पारंपारिक, सांस्कृतिक पद्धतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे.

ठा.म.पा प्रभाग क्र. ४ च्या भाजपा च्या स्थानिक नगरसेविका तथा नवयुग मित्र मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा रमेश आंब्रे, मंडळाचे संस्थापक तथा भाजपा ठाणे शहर (जिल्हा) उपाध्यक्ष रमेश आंब्रे व मंडळाचे सरचिटणीस डॉ. सागर रमेश आंब्रे ह्यांच्या नियोजनाखाली रविवार दि. १५/१०/२०२३ ते मंगळवार दि. २४/१०/२०२३ रोजी पर्यंत देवी मंडप, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, टिकूजीनीवाडी, मानपाडा, ठाणे येथे हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पारंपारिक, सांस्कृतिक व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. नऊ दिवस होणाऱ्या उत्सवाला विविध नृत्य, सप्तशती पाठ, हरी पाठ, जाप, गोंधळ देवीचा जागर, भजन कीर्तन, नि:शुल्क वैद्यकीय आरोग्य शिबीर, कालीपुत्र कालीचरण महाराज ह्यांचे हस्ते भव्य महाआरती, रास गरबा, भव्य इन्स्टाग्राम रील्स स्पर्धा, खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, १५१ कुमारिकांचे कन्यापूजन व सन्मान, पूजा होम हवन व महाप्रसाद तसेच उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page