पत्रकार प्रशांत सिनकर यांना नॅशनल आयकॉन अवॉर्ड !

Spread the love

नोएडा येथील हिंदुस्थान न्युज नेटवर्कचा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार

ठाणे : पर्यावरण अभ्यासक आणि पत्रकार प्रशांत रविंद्र सिनकर यांना राष्ट्रीयस्तरावर नोएडा येथील हिंदुस्थान न्युज नेटवर्क यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२३” देण्यात आला आहे.

पत्रकारिता करत असताना पर्यावरण संवर्धनासाठी बहुमूल्य योगदान देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रशांत सिनकर यांना प्रतिष्ठेचा “नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२३” दिला असल्याची माहिती हिंदुस्थान न्युज नेटवर्कचे मुख्य संपादक मोहित नारायण यांनी दिली. या अगोदर प्रशांत सिनकर यांना पश्चिम बंगाल येथील भारत सरकारशी सलग्न काम करणाऱ्या नव्या फाऊंडेशनचा
राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान २०२३ हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचा शि.म.परांजपे पुरस्कार, नेपाळ येथील आंतराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत इको-२०१३ पुरस्कार, भारतरत्न राजीव गांधी पर्यावरण भूषण पुरस्कार, ठाणे महापालिकेचा ठाणे गुणिजन, ठाणे गौरव अशा विविध पुरस्कारांनी गौरवलं आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page