‘उद्धव ठाकरेंनी 2 फोन केले हे खरं’; नारायण राणेंनी सांगितलं जसच्या तस संभाषण!….

Spread the love

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंच्या फोन कॉलसंदर्भात माहिती दिली.

‘उद्धव ठाकरेंनी 2 फोन केले हे खरं’; नारायण राणेंनी सांगितलं जसच्या तस संभाषण!…

मुंबई/ प्रतिनिधी- दिशा सालियन प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चेत आलंय. दिशाच्या वडिलांनी लेकीच्या मृत्यूची चौकशीची मागणी केली. यानंतर राणे परिवाराकडून आदित्य ठाकरेंना पुन्हा टार्गेट करण्यात आलंय. दरम्यान उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केल्याचे विधान आमदार नितेश राणेंनी केलंय. याप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. असे असले तरी खुद्द केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत यावर माहिती दिली आहे. दिल्लीत लोकसभेचं अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली.

उद्धव ठाकरेंनी दोन फोन केले हे खर आहे. त्यावेळी जी घटना घडली तेव्हा मी मुंबईवरून माझ्या जुहूच्या घरी चाललो होतो. वांद्रे क्रॉस केल्यानंतर उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांचा मला फोन आला, असे नारायण राणेंनी सांगितले.

उद्धव ठाकरेंना तुमच्याशी बोलायचंय, असे मिलिंद नार्वेकरांनी मला सांगितले. यानंतर उद्धव ठाकरेंनी फोन घेतला.’जय महाराष्ट्र साहेब असे म्हणाले. तुम्हाला मूले आहेत मलाही आहेत. पत्रकार परिषदेत सध्या तुम्ही आदित्यचे नाव घेता. त्याचे नाव घेऊन नये अशी विनंती त्यांनी आपल्याला फोनवर केल्याचे नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत सांगितले. एकतर मी अमुक ठिकाणी, अमुक घटनेत कोण आहे? याचा उल्लेख केला नाही, असे राणेंनी यावेळी म्हटले. तुम्ही नाव घेतले त्या मुलाला संध्याकाळी जिथे जातो तिथे जाऊ नको म्हणून सांगा. दिनो मोरयाच्या घरी काय धुमाकूळ घालतात ते तुम्हाला माहीत नाही, असे आपण ठाकरेंना सांगितल्याचे ते म्हणाले.
मी पाहतो सांगतो असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे राणेंनी पत्रकारांना सांगितले. उद्धव ठाकरेंसोबत कोरोना काळात दुसऱ्यांदा बोलणं झालं होतं. माझ्या रुग्णालयाचे उद्घाटन होते. कॉलेजच्या परवानगीसाठी मी कॉल केला असे त्यांनी सांगितले.

अनिल परबांवर टीका…

अनिल परब आणि आक्रमकता हे समीकरण जमते का? त्यांनी कोणाच्याही कानफाडात मारल्याचे पाहिले आहे का? वकील असल्यामुळे ते भाषणे करू शकतात. त्यांनी उगाच बढाया मारू नये. काही जमणार नाही, असा टोला नारायण राणेंनी लगावला. चित्रा वाघ तुम्हाला पुरुन उरेल. तिच्या मागे पूर्ण भाजप आणि नारायण राणे आहे, असल्याचे ते म्हणाले.

त्वरित FIR का केली नाही?…

दीशाचे वडील सतीशजी यांचे ते अपील पूर्ण वाचले का? त्यात माझा काही सबंध आहे का? दबाव होता पेडणेकर यांचा दबाव होता. आम्ही कधी घरी गेलो नाही. त्यावेळी त्यांना पोलीस मदत करत नव्हते. आरोग्य विभाग मदत करत नव्हते. रुग्णवाहिका बदलली. जे काय प्रकार झाले ते प्रकरण दडपण्यासाठी झाले. म्हणून आता त्यांच्या वडिलांनी कोर्टाची धाव घेतली. त्या प्रकरणात सरकारने सुप्रीम कोर्टाची रूलिंग आहे जर एखाद्या महिलेवर अन्याय झाला असेल तर त्वरित एफआयआर करायची. मग का नाही केली? असा प्रश्न त्यांनी विचारला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page