मुंबईच्या पराभवाची हॅट्रीक मुंबईच्या संघाला लखनौकडून पराभव पत्करावा लागला तेव्हाच झाली. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएमधून बाहेर पडला की त्यांना अजून संधी आहे, याची जोरदार चर्चा सुरु झाली. पण मुंबईबाबतचे आयपीएल प्ले ऑफचे समीकरण काय असेल ते जाणून घेऊया…
या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाने ९ सामने खेळले होते. या ९ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे सहा पराभव झाले होते, तर त्यांना तीनच विजय मिळवता आले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या खात्यात सहा गुण जमा झालेले होते. मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा पराभव ठरला आणि त्यामुळे त्यांना आता मोठा धक्का बसला आहे. कारण आता मुंबईचे १० सामने झाले आहेत आणि या १० सामन्यांमध्ये त्यांच्या खात्यात फक्त तीनच विजय आहेत. मुंबईला १० सामन्यांमध्ये तब्बल सात पराभव पत्करावे लागले आहेत. त्यामुळे मुंबईच्या संघाचे १० सामन्यांनंतर फक्त सहा गुणच आहेत. त्यामुळे ते प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात की नाही, याचे समीकरण समोर आले आहे.
मुंबई इंडिन्सचे १० सामने झाले आहेत. आयपीएलमध्ये प्रत्येक संघाला १४ सामने खेळावे लागतात. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे आता चार सामने शिल्लक आहेत. मुंबईला या चार सामन्यांमध्ये केकेआरशी दोन सामने खेळावे लागणार आहेत, त्याचबरोबर त्यांचा प्रत्येकी एक सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे.
मुंबईला आता जर प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना हे सर्व सामने जिंकावे लागतील, त्याचबरोबर त्यांना आपला रन रेटही वाढवावा लागेल. त्यामुळे मुंबईला या चारही सामन्यांत मोठ्या फरकाने विजय मिळवावे लागतील. मुंबईने चारही सामने जिंकले तर त्यांचे १४ गुण होतील आणि त्यांचा रन रेट चांगला राहीला तर ते प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात. पण आता एकही पराभव झाला तर मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे आता मुंबई इंडियन्ससाठी प्रत्येक सामना महत्वाचा ठरणार आहे.
मुंबई इंडियन्सचे अधिकृतपणे आयपीएलमधील आव्हान अजूनही संपलेले नाही. कारण अजूनपर्यंत आयपीएलमधील सर्व संघांना प्ले ऑफची संधी असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबईचे आव्हान अद्याप संपलेले नाही. पण जर त्यांनी पुढच्या सामन्यात पराभव पत्करला तर मात्र त्यांचे आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे यापुढील सर्वच सामने मुंबईच्या संघासाठी महत्वाचे ठरणार आहेत.