४६ रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची राजापूर शहरामध्ये जोरदार प्रचार रॅली, आमदार डॉ.राजन साळवीचे संपुर्ण कुटुंब सहभागी..

Spread the love

रत्नागिरी प्रतिनिधी:- आज ४६ रत्नागिरी -सिधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक भाऊराव राऊत यांच्या प्रचारार्थ राजापूर शहरामध्ये जोरदार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या रॅलीचे विशेष अस आकर्षण म्हणजे संपुर्ण साळवी परिवार.

लोकसभेच्या प्रचाराची रंगत आता वाढत चालली असून प्रत्येक जण आपापल्या परीने प्रचारात सहभागी होताना दिसून येत आहेत. त्याचवेळी महाराष्ट्राचा राजकारणातील एकनिष्ठ शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ राजन प्रभाकर साळवी हे दिवसरात्र तन-मन-धन अर्पून प्रचारात सहभागी आहेतच पण त्यांचा संपूर्ण परिवार प्रचारात सहभागी असलेला आज राजापूर शहरातील प्रचार रॅलीत दिसून आले.

आजच्या प्रचार रॅलीत शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांच्या सह त्यांचे मोठे बंधू उद्योजक दीपक (भाऊ) साळवी, पत्नी सौ. अनुजा राजन साळवी, चिरंजीव शुभम राजन साळवी, सून सौ. अंतरा शुभम साळवी व युवासेना कॉलेज युनिट निरीक्षक (महाराष्ट्र राज्य) अथर्व राजन साळवी व शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरदचंद्र पवार), आप, सर्व प्रमुख पदाधिकारी, तालुकाप्रमुख, उप तालुकाप्रमुख , विभागप्रमुख, उप विभागप्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शाखाप्रमुख, सरपंच, उप सरपंच, सदस्य ग्रामपंचायत, बुथप्रमुख, गटप्रमुख, उप शाखाप्रमुख मुंबई व ग्रामीण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page