ठाणे :- मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. सरकारने त्यांच्याकडे वेळ मागितली आहे. सरकारच्या या भूमिकेवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी टीका केली आहे.
आमदार पाटील म्हणाले, मराठा आरक्षण या विषयावर मनसे प्रमुख राज ठाकरे हे मागे ही बोलले होते की सर्वांची इच्छा आहे तर आरक्षण का देत नाहीत. जरांगे पाटील यांना आश्वासन दिलेलं काही दिवसात आरक्षण दिले जाईल, त्यांनी तो वेळ दिला होता. त्यावेळेस यांनी का झोपा काढल्या. आता टोकाशी आल्यावर त्यांना सांगतात उपोषणाला बसू नका. दोन पावलं मागे घ्या अजून वेळ द्या. पण हे प्रकार होताच का ? आज दिल्लीला गेलेत तेव्हा जायचं होतं उपोषण सोडल्याबरोबर. मात्र हे कुठेतरी कमी पडतात. जातीपाती भांडण लावून राजकारणाचा जो पोर खेळ सुरू आहे.
राजकारणाचा जो फिस्का झालेला आहे याच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व काही करत आहेत. आरक्षण हे टिकणार द्यावं लागेल. व त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. जातीनिहाय त्याची जनगणना करावी लागेल अनेक गोष्टी आहेत. याच्यासाठी कोणी पुढाकार घेतला नाही त्यामुळे हे फक्त तोंडाला पान पुसायचं चालू आहे असे म्हणत आमदार पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल केला आहे.