
मंडणगड (प्रतिनिधी)- गोवा येथे संपन्न झालेल्या ऑल इंडिया राष्ट्रीय तायक्वॉंडो स्पर्धेत सब ज्युनिअर गटात रोप्य पदक प्राप्त केलेल्या कु. प्रशिक आदेश मर्चंडे यांचा तहसीलदार अक्षय ढाकणे यांचे हस्ते, तर अमृतसर येथे संपन्न झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी तायक्वॉंडो स्पर्धेत कास्य पदक मिळवणाऱ्या अभिषेक अशोक मर्चंडे यांचा सत्कार प्रजासत्ताक दिनी तहसीलदार कार्यालय मंडणगड येथे पोलिस निरीक्षक श्री. नितीन गवारे यांचे हस्ते करण्यात आला. प्रशिक मर्चंडे हा जिल्हा परिषद शाळा, गांधी चौक, मंडणगड येथील विद्यार्थी आहे. या दोन्ही खेळाडूनी मंडणगड तालुका तायक्वॉंडो अकॅडमी येथे प्रशिक्षण घेतले आहे.
यावेळी तहसीलदार श्री. अक्षय ढाकणे यांनी सांगितले की या स्पर्धेत मंडणगड तालुका तायक्वान्डो अकॅडमीच्या विद्यार्थ्यानी यश संपादन करून मंडणगड तालुक्याचे नाव उज्ज्वल करून मंडणगड तालुक्याची मान उंचावली आहे. ही बाब मंडणगड तालुक्याकरीता अभिमानाची आहे. या विद्यार्थ्याना तायक्वॉंडोचे प्रशिक्षण देणाऱ्या ॲड. तेजकुमार विश्वदास लोखंडे व सौ. काजल लोखंडे यांचेही तहसीलदार श्री. अक्षय ढाकणे व पोलिस निरीक्षक श्री. नितीन गवारे यांनी अभिनंदन केले. या त्यांच्या यशाबद्दल मंडणगड परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या कार्यक्रमास मंडणगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित कुंभार, नायब तहसीलदार संजय गुरव, रत्नागिरी जिल्हा तायक्वॉंडो असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, तायक्वॉंडो तालुका असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत सुर्वे, तायक्वॉंडो क्लबचे अध्यक्ष आदेश मर्चंडे, माजी सभापती भाई पोस्टुरे, रमेश दळवी, विनोद जाधव, वैभव कोकाटे, प्रशिक्षक ॲड. तेजकुमार लोखंडे व सौ. काजल लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.