दिनांक 9 मे 2024 जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून ‘या’ राशींचा गुरूवार ठरेल खास; कामात मिळेल यश, वाचा राशी भविष्य….

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

▪️मेष :

आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह स्वादिष्ट भोजन घेऊन आनंदात वेळ घालवू शकाल. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी उत्तम नियोजन करू शकाल. आज प्राप्तीत वाढ होईल. कलावंत, कारागिर यांना आपलं कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल आणि त्यात त्यांची कदर सुद्धा केली जाईल. नकारात्मक विचारापासून दूर राहा.

▪️वृषभ :

आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस उत्साह आणि प्रसन्नतेचा आहे. प्रकृती उत्तम असल्यानं सुख आणि आनंद अनुभवाल. सगे – सोयरे किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. प्रवास आणि स्वादिष्ट भोजन यामुळं आजचा दिवस आणखीच आनंदी होईल. आर्थिक फायदा संभवतो. आज वैवाहिक जीवनातील सौख्य प्राप्त होईल.

▪️मिथुन :

आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपले संयमशील आणि विचारपूर्ण वर्तन अनेक अनिष्ट गोष्टींपासून आपला बचाव करू शकेल. आपल्या वक्तव्यानं गैरसमज निर्माण होतील. शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील. कौटुंबिक वातावरण गढूळ राहील. डोळ्यांना पीडा होईल. खर्च जास्त होईल. मानसिक शांतीसाठी आपणास प्रयत्न करावे लागतील.

▪️कर्क :

आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे झाल्यानं आपण आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होतील. संतती आणि पत्नी याच्याकडून लाभ होईल. प्रवास, पर्यटन संभवतात. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. आज उत्तम भोजन आणि स्त्रीसुख मिळेल.

▪️सिंह :

आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टिने उत्तम आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. पैतृक लाभ संभवतो. सरकारी कामात फायदा होईल. प्रकृती चांगली राहील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. घर, जमीन आणि मालमत्तेचे व्यवहार यशस्वी होतील.

▪️कन्या :

आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. परदेशस्थ आप्तेष्टांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांकडून काही लाभ संभवतो. विविध मार्गाने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

▪️तूळ :

आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी असल्यानं नवे कार्य हाती घेऊन त्यात यशस्वी होऊ शकाल. वक्तृत्व आणि कृती संयमित ठेवणं हितावह राहील. द्वेषापासून दूर राहा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. रहस्यमय आणि गूढविद्येकडं आकर्षित व्हाल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. भिन्नलिंगी व्यक्ती आणि पाण्यापासून दूर राहणं हितावह राहील. मनाला शांती मिळण्यासाठी प्रयत्नशील राहा.

▪️वृश्चिक :

आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस काहीसा वेगळाच आहे. स्वतःसाठी वेळ काढू शकाल. मित्रांसह प्रवास, मौज – मजा, मनोरंजन आणि एखाद्या सहलीस जाऊन तसेच रुचकर भोजन, वस्त्रालंकार इत्यादींमुळं आज आपण खूप आनंदी राहाल. मान-सन्मानात वाढ होऊन एखादा सत्कार होण्याची शक्यता सुद्धा आहे. वाहनसौख्य मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्यानं आपलं मन प्रफुल्लित होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

▪️धनू :

आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. घरात शांतता आणि आनंदाचं वातावरण राहील. नोकरीत लाभ व सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कार्यात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. आईच्या घराण्याकडून एखादी चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. वाणीवर संयम ठेवावा लागेल. मित्र-मैत्रिणींचा सहवास घडेल.

▪️मकर :

आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण मनाने खूप अशांत राहाल. आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही आणि त्यामुळं तणावात राहाल. शक्यतो आज कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आज आपणास नशिबाची साथ न मिळाल्यानं आपणास नैराश्य येईल. संततीविषयी चिंतीत व्हाल. कुटुंबातील थोरांची प्रकृती बिघडू शकते. शारीरिकदृष्टया अस्वस्थ राहाल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद-विवाद टाळावेत. पोटाचे दुखणे बळावण्याची शक्यता आहे.

▪️कुंभ :

आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज आपण अती संवेदनशील झाल्यानं आपलं मन बेचैन व अस्वस्थ होईल. जीद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. स्थावर-संपत्ती किंवा वाहन ह्यांचे कागदपत्र बनवताना सावध राहावं. महिलांचा सौंदर्य प्रसाधने, वस्त्र, आभूषणे यांच्या खरेदीसाठी खर्च होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल.

▪️मीन :

आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस महत्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक आणि कलात्मक शक्ती वाढेल. मित्र आणि कुटुंबियांसह एखाद्या प्रवासाला जाल. भावंडांकडून फायदा होईल. कामाचे यश आपलं मन आनंदी करेल. सार्वजनिक जीवनात मान – सन्मान होतील. आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकाल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page