मोठी बातमी! लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक मंजूर…

Spread the love

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर वक्फ संशोधन विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. मध्यरात्री उशिरा या विधेयकावर मतदान पार पडलं.

मोठी बातमी! लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक मंजूर..

मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आलं,  या विधेयकावर  मध्यरात्री उशिरा  लोकसभेत मतदान पार पडलं. अखेर हे विधेयक मंजूर झालं आहे. विधेयकाच्या बाजुनं 288  इतकी मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात 232  इतकी मतं पडली आहेत.

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं. वक्फ सुधारणा विधेयक संसदेमध्ये सादर होताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.  “वक्फ विधेयकात धार्मिक स्थळांबाबत काहीही नाहीये. केंद्र सरकार कोणत्याही धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करत नाहीये. हा केवळ वक्फच्या संपत्तीच्या नियोजनाचा विषय आहे” अशी भूमिका हे विधेयक संसदेत सादर करताना संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मांडली. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर चर्चा सुरू होती. चर्चेनंतर मतदान घेण्यात आलं.

दरम्यान मतदानापूर्वी देखील किरेन रिजिजू यांनी या विधेयकावरून विरोधकांवर निशाणा साधला. विरोधक वक्फ संशोधन विधेयकाला असंवैधानिक का म्हणत आहेत ते माहीत नाही. हे विधेयक असंवैधानिक कसं आहे हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे एकही कारण नाही असं किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे विरोधकांनी देखील या विधेयकाच्या चर्चेवेळी आक्रमक भूमिका मांडली त्यामुळे लोकसभेत चांगलाच गोंळध झाल्याच पाहायला मिळालं. एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी या विधेयकावरील चर्चेवेळी म्हणाले की, सरकार मदराशांना लक्ष्य बनवत आहे. आता वक्फची मालमत्ता ताब्यात घेतली जाणार आहे. मुस्लिमांच्या जमिनीचा निर्णय अधिकारी घेतील. बिगर मुस्लिम व्यक्ती वक्फ बोर्ड चालवतील, या विधेयकाचा मुस्लिमांना काहीही फायदा होणार नाही. दरम्यान यावेळी ओवैसी यांनी विधेयकाची प्रत देखील फाडली. तर दुसरीकडे सत्ताधारी खासदारांनी या विधेयकाचं जोरदार समर्थन केल्याचं पाहायला मिळालं. अखेर चर्चेनंतर या विधेयकावर लोकसभेत मतदान घेण्यात आलं. विधेयकाच्या बाजुनं 288 मत पडली तर विधेयकाच्या विरोधात 232 मत पडली. हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. आता आज हे विधेयक राज्यसभेत सादर केलं जाणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page