कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडेंच्या शिरपेचात तुरा, राष्ट्रपती पदक जाहीर…

Spread the love

२००५ सालचे भारतीय पोलीस सेवेतील आयपीएस अधिकारी असलेले संजय दराडे हे मूळचे नाशिक येथील आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द बाळगत त्यांनी प्रशासकीय सेवेत यश मिळवले

नवी मुंबई : कोकणात गेल्या एक वर्षात धडाकेबाज कामगिरी करणारे कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी हा सन्मान सोहळा होणार आहे. कोकण परिक्षेत्रात गेल्या दोन वर्षात खून, महिला अत्याचारासारख्या गुन्ह्यात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी सूत्रं हाती घेतल्यानंतर दिले होते.

इतकंच नाही तर गेल्या वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही त्यांच्याच कार्यकाळात पार पडल्या. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून त्यांनी निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या. कोकणात काही ठिकाणी संवेदनशील परिस्थिती असतानाही संजय दराडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त व प्रतिबंधात्मक कारवाई करत या सगळ्याचे नियोजन केले. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असलेले कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय दराडे यांच्या कामाची दखल केंद्र शासनाकडून घेण्यात आली आहे.

२००५ सालचे भारतीय पोलीस सेवेतील आयपीएस अधिकारी असलेले संजय दराडे हे मूळचे नाशिक येथील आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द बाळगत त्यांनी प्रशासकीय सेवेत यश मिळवले. संजय दराडे यांनी पुणे इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयात शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली होती.

संजय दराडे यांनी कोकण विभागाचे सूत्र हाती घेतल्यानंतर कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः भेटी दिल्या होत्या. त्यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केलं होतं. विशेषतः महिलांवरील अत्याचारांबाबत असलेल्या तक्रारींवर २४ तासांच्या आत गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार अनेक ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

इतकंच नाही तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात काही हत्या प्रकरणं घडली आहेत. या बहुतांश हत्या प्रकरणातही संबंधित आरोपीला निष्पन्न करून कारवाई करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी मोठी भूमिका बजावली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता धडाकेबाज कारवाई ही त्यांची विशेष कामगिरी ठरली आहे.

२०१७ मध्ये नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक असताना दराडेंनी उत्तर प्रदेशातून येणारा बंदुकींसारखा अवैध शस्त्रसाठा जप्त करून, तब्बल ४५ बंदुका आणि तीन हजार काडतुसे पकडून आठ जणांची आंतरराज्य टोळी त्यांनी जेरबंद केली होती. ही अत्यंत संवेदनशील आणि मोठी धडाकेबाज कारवाई केली होती. त्या वेळेला अवघ्या महाराष्ट्रात मोठा चर्चेचा विषय ठरली होती.

आता लवकरच कोकण परिक्षेत्रात जिल्हा पोलीस ठाण्यात अद्यावत सोशल लॅब सुरू करण्यासाठी त्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच या सोशल सायबर क्राईमच्या विरोधात सोशल लॅब ऍक्टिव्ह होणार आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page