कधी आहे रोझ डे? जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस कपल्ससाठी का असतो खास!

Spread the love

१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे. मात्र व्हॅलेंटाइन डेच्या आधीच प्रेमाचा आठवडा सुरू होतो. प्रेमाचे काही टप्पे पार करून शेवटच्या दिवशी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीक सुरू होतो. व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी रोझ डे साजरा केला जातो. रोझ डे म्हणजे गुलाबाचा दिवस. गुलाबाला भावना व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते. खरं तर, एखाद्याला विशिष्ट रंगाचा गुलाब देऊन, आपल्या हृदयाचे शब्द हावभावात सांगता येतात.

गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा वेगळा अर्थ असतो. वेगवेगळ्या रंगांचे गुलाब सिंगल्सच्या हृदयात आशा निर्माण करतात. पण रोझ डे हा केवळ जोडप्यांचा दिवस नाही. प्रत्येकजण हा दिवस साजरा करू शकतो. रोझ डे साजरा करण्यामागील कारण आणि सेलिब्रेशनची योग्य पद्धत जाणून घेऊन तुम्हीही तो साजरा करू शकता. चला जाणून घेऊया की, व्हॅलेंटाईन वीक रोझ डेने का सुरु होतो? रोझ डेचा इतिहास काय आहे आणि प्रेमींसाठी गुलाब खास का आहे?

कधी असतो रोझ डे?

व्हॅलेंटाईन वीक ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जातो. रोझ डे व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, म्हणजेच ७ फेब्रुवारीला रोझ डे असतो. या दिवशी लोक आपल्या जोडीदाराला, मित्राला किंवा खास व्यक्तीला गुलाब देऊन आपल्या भावना व्यक्त करतात.

का साजरा करावा रोझ डे?

गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गुलाबाचे रंग भावना व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन वीक तुमच्या मनाला व्यक्त करण्याची संधी देतो. म्हणूनच रोझ डे हा जोडप्यांसाठी खास असतो. प्रियकर आपल्या प्रेयसीला गुलाब देऊन त्याच्या हृदयात दडलेले प्रेम व्यक्त करू शकतो. जर तुमचे कोणावर प्रेम असेल, तर तुम्ही त्यांना गुलाब देऊ शकता. याशिवाय जर तुम्हाला कोणाशी मैत्री करायची असेल, किंवा एखाद्याला खूप आदर द्यायचा असेल, किंवा तक्रारी मिटवून शत्रूशी हस्तांदोलन करायचे असेल, तर तुम्ही खास रंगाचे गुलाब देऊन हा दिवस साजरा करू शकता.

रोझ डेचा इतिहास

व्हॅलेंटाईन वीकमध्ये रोझ डे साजरा करण्याची एक खास कहाणी आहे. मुघल बेगम नूरजहाँ हिला लाल गुलाब खूप आवडायचे. तिला खुश करण्यासाठी जहांगीर रोज एक टन ताजे गुलाब नूरजहाँच्या राजवाड्यात पाठवत असे. त्या त्यांची लव्हस्टोरी खूप गाजली होती.

एक कथा राणी व्हिक्टोरियाच्या काळातील आहे. त्या काळातील लोक आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एकमेकांना गुलाबाची फुले देत असत. या परंपरेनुसार व्हॅलेंटाईन वीकमध्ये एक दिवस रोझ डे म्हणून साजरा केला जातो.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page