पत्रकार शशिकांत वारीशे यांचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू…

Spread the love

राजापूर: राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर महिंद्रा थार या चारचाकी गाडीने पत्रकार शशिकांत शंकर वारीशे (वय ४५, रा. कशेळी) यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली होती. या अपघातात शशिकांत वारीशे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी ०८:०० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती राजापुरात पसरल्यानंतर हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली येथील पेट्रोलपंपासमोर भरधाव महिंद्रा थार या गाडीने पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या गाडीला पेट्रोल पंपातुन बाहेर पडताना जोरदार धडक दिली. या धडकेत वारीशे हे दुचाकीवरून खाली पडले तर त्यांची दुचाकी थार गाडीबरोबर फरफटत सुमारे २०० ते २५० फुट पुढे गेली. वारिशे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वारीशे यांना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकिय रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर रात्री त्यांची तब्येत खालावल्याने कोल्हापुरातील सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page