
संगमेश्वर- संगमेश्वरातील शाळा आरवली नं.१ व. तुरळ हरेकरवाडी येथे फिरती विज्ञान प्रयोग शाळेच्या वतीने करण्यात आले आयोजन!
हे असे का?ते तसे का?याचं कारण काय ? पाण्याचा व आकाशाचा रंग निळा का? अशा प्रकारचे प्रश्न बालवयात मनात येऊन सूर्याच्या किरणांचा व गुणधर्माचा वैज्ञानिक दृष्टीने भौतीक शास्रात संशोधन करून इंग्लंडच्या नेचर नियतकालिकेत प्रकाशित करून नोबेल पारितोषिक ज्यांनी मिळविले ते थोर शास्त्रज्ञ सी.व.ही रामण यांनी सूर्याचे विकिरण हा शोध २८फेब्रुवारी १९२८ रोजी लावला ,म्हणून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो.अशा शास्त्रज्ञांच्या अंगी असलेली शोधक गुणग्राहकता जोपासून विज्ञानातील प्रगती समजून घ्या. व विज्ञानाच्या सोयी सुविधांचा गैरवापर टाळून योग्यच वापर करून समाधान मिळवा अशा प्रकारचे मार्गदर्शनपर विचार सेवानिवृत्त प्राथ. शिक्षक श्रीकृष्ण खातू यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमात व्यक्त केले.

फिरती विज्ञान प्रयोग शाळा तालुका संगमेश्वर या प्रकल्प समितीच्या वतीने शाळा आरवली नं.१ शाळा तुरळ हरेकरवाडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खातू बोलत होते. त्या वेळी त्यांनी पुढे बोलतांना अनेक शास्त्रज्ञांची बालवयापासूनची शोधक जिज्ञासू वृत्ती,केलेले छोटे छोटे प्रयोग ,त्यात ठेवलेले सातत्य,प्रत्येक गोष्टीतील सत्य, सखोल निरीक्षण व विचार करून अंधश्रध्दा नसून त्याठिकाणीं वैज्ञानिक दृष्टिकोन आहे हे अनेक शास्त्रज्ञांनी जगाला पटवून दिले आहे. अशा सर्व मंडळींची आज आपणास नक्कीच आठवण होते, हे विसरता येत नाही. हे सांगितले.


यावेळी प्रशिक्षक दिलीप काजवे, आरवली शाळा मुख्याध्यापक अशोक जायभाये,शिक्षिका शिगवण, तुरळ हरेकरवाडी शाळेचे शिक्षक सुभाष लवटे,शिक्षिका आवटे,शिबे,व नांदिवडेकर उपस्थित होते.
