
किरणभैय्या सामंत यांना बहुमताने निवडून द्या म्हणून माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे मतदारांना आवाहन…

राजापूर / प्रतिनिधी – २६७ राजापूर-लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय रयत क्रांती संघटना बळीराज सेना व मित्र पक्षाचे उमेदवार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या प्रचारार्थ रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत जाहीर सभा ओणी ता. राजापुर येथे संपन्न झाली.
या मेळाव्यात मतदारांना संबोधित करताना सदाभाऊ खोत म्हणाले, कोकणाला पर्यटनाची जोड दिली तर भारतातील सर्व पर्यटक कोकणात खास पर्यटनासाठी येतील. त्यामुळे कोकण विकसित होईल आणि येथील गोरगरीब बेरोजगार जनतेला यातून रोजगाराची चालना मिळू शकते. त्यामुळे आपल्या मतदारसंघाच्या बाबतीत आरोग्य रोजगार शिक्षण पर्यटन या बाबतीत मोठे व्हिजन असणाऱ्या किरणभैया सामंत यावेळी बहुमताने निवडून दिले पाहिजे. किरणभैया एक उद्योजक आहेत आमदार झाल्यानंतर तेच आपल्या मतदार संघात उद्योगधंदे उभे करू शकतात. त्यामुळे आपल्या कोकणातील तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि कोकणातील बंद झालेली दरवाजे पुन्हा उघडतील असा आत्मविश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार प्रमोदजी जठार, भाजपा नेते राजन देसाई, भाजपा तालुका अध्यक्ष भास्कर सुतार, जिल्हा संघटक प्रकाश कोळेकर, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले, तालुका संघटक भरत लाड, रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष संतोष आरावकर, भाजपा उपाध्यक्ष अभिजीत कांबळे भाजपा उप तालुका अध्यक्ष फारुख साखरकर, महिला तालुकाप्रमुख शुभांगी डबरे तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.