एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असतो. त्यामुळे अशा व्यक्तीला आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी, मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. अशा व्यक्तीच्या विवाहास विलंब होतो.
घरात पितृदोष असल्यास असा घटना घडू लागतात; अमावस्येला मुक्ती मिळवण्याचे उपाय…
*मुंबई :* ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या दोषांमध्ये कालसर्प दोष आणि पितृदोष हे सर्वात त्रासदायक मानले जातात. ज्योतिषी आणि वास्तु तज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा सांगत आहेत, कुंडलीत पितृदोष कसा निर्माण होतो आणि त्याचे काय परिणाम होतात? पितृदोष म्हणजे काय? ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होत नाही, तेव्हा हे आत्मे पृथ्वीवर राहणाऱ्या आपल्या वंशजांना त्रास देतात. याला ज्योतिषशास्त्रात पितृदोष म्हणतात.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, पूर्वजांचा अनादर, त्यांच्यासाठी श्राद्ध कार्य वैगेरे न करणं या गोष्टींमुळे पूर्वजांचे आत्मे त्यांच्या कुटुंबातील लोकांना मृत्यूच्या भूमीवर पहात असतात. आपल्या पूर्वजांचा शाप हा पितृदोष मानला जातो. कुंडलीत पितृदोष कसा तयार होतो? ज्योतिषशास्त्रीय घटनांनुसार, जेव्हा सूर्य, मंगळ आणि शनि लग्न भावात आणि व्यक्तीच्या कुंडलीच्या पाचव्या घरात असतात तेव्हा पितृदोष तयार होतो. याशिवाय जेव्हा कुंडलीच्या आठव्या भावात गुरु आणि राहू एकत्र असतात तेव्हाही पितृदोषही निर्माण होतो. जेव्हा राहू कुंडलीत मध्यभागी किंवा त्रिकोणामध्ये असतो तेव्हा पितृदोष तयार होतो. याशिवाय जेव्हा सूर्य, चंद्र आणि लग्नेश स्वामी यांचा राहूशी संबंध असतो, तेव्हा व्यक्तीच्या कुंडलीत पितृ दोष तयार होतो. शिवाय एखादी व्यक्ती आपल्या वडिलधाऱ्यांचा अनादर करते किंवा त्यांना मारहाण करते, तेव्हा अशा व्यक्तीला पितृदोष लागतो.
पितृदोषाची लक्षणे-
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असतो. त्यामुळे अशा व्यक्तीला आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी, मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. अशा व्यक्तीच्या विवाहास विलंब होतो. जमलेलं लग्न मोडू शकतं. वैवाहिक जीवनात तणाव असतो. महिलांना गरोदरपणात समस्यांना सामोरं जावं लागतं. मुलाचा अकाली मृत्यू होऊ शकतो. कर्जबाजारीपणा आणि नोकरीतील समस्या आयुष्यात येत राहतात. याशिवाय अशा लोकांच्या घरात किंवा कुटुंबात अचानक मृत्यू किंवा अपघात होऊ शकतो. काही आजारामुळे तुम्ही दीर्घकाळ त्रस्त राहू शकता. कुटुंबात अपंग असलेले मूल जन्माला येऊ शकते. अशा व्यक्तीला वाईट सवयी देखील लागू शकतात.
पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय…
▪️जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर त्यानं काही उपाय करून घेणं अत्यंत गरजेचे आहे. अशा व्यक्तीने प्रत्येक अमावास्येला आपल्या घरी श्रीमद्भागवतातील गजेंद्र मोक्ष अध्यायाचे पठण करावे.
▪️प्रत्येक चतुर्दशी, अमावस्या आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करणे आणि भगवान विष्णूची प्रार्थना करणे शुभ मानले जाते.
▪️ जर कुंडलीत पितृदोष तयार होत असेल तर घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर आपल्या पूर्वजांचा फोटो लावून त्यांना हार घालून त्यांची रोज पूजा करावी आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा.
▪️पितृदोषाच्या उपायासाठी प्रत्येक शनिवारी उडीद पिठापासून बनवलेला पदार्थ काळ्या कुत्र्याला खाऊ घातल्यास शनि, राहू, केतू या तिन्ही ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.
▪️पितृपक्षात किंवा ज्या तिथीला तुमच्या पूर्वजांचे निधन झाले आहे त्या तिथीला पितृदोष शांती (श्राद्ध) विधिवत केल्यानं पितृदोष कमी होतो.